शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शेगावचे ६ नगरसेवक पात्रच-उच्च न्यायालय

By admin | Updated: July 25, 2016 21:28 IST

कॉग्रेसचे माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील यांच्यासह ६ नगरसेवकांच्या विरोधात जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी दिलेला निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध ठरवित सहाही

नियम पाळले नाही म्हणून प्रकरण पुनर्निर्णयासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडेशेगाव : कॉग्रेसचे माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील यांच्यासह ६ नगरसेवकांच्या विरोधात जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी दिलेला निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध ठरवित सहाही नगरसेवक पात्र असल्याचा निकाल सोमवारी दिला. शिवाय निकाल देतांना नियम पाळले नाही म्हणून जिल्हाधिकारी यांच्या निर्णयावर ताशेरे ओढत सदर प्रकरण पुनर्निर्णयासाठी बुलडाणा येथे पाठविले आहे. यामुळे शेगांवच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

पक्षादेश नाकारून पक्ष आदेशाविरूध्द मतदान केल्याच्या प्रकरणानंतर कॉग्रेसचे गटनेते शिवाजी बुरूंगले यांनी नगराध्यक्षा सौ.शारदा कलोरे यांच्यासह ४ नगरसेवकांविरूध्द जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे अपात्रतेसाठी प्रकरण दाखल केले होते व त्यानंतर दुसऱ्या गटातून सौ.शारदा कलोरे यांनी आघाडीमधून कॉग्रेसमध्ये प्रवेश घेतलेल्या नगरसेवक शैलेंद्र पाटील यांच्यासह ६ नगरसेवकांना अपात्र ठरविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रकरण दाखल केले होते.

यावर ६ नगरसेवकांना जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी अपात्र घोषीत केल्यानंतर शैलेंद्र पाटील यांनी उच्च न्यायालयात दाद मागीतली होती. या प्रकरणावर सोमवारी नागपूर खंडपिठात न्यायमूर्ती झेड.ए. हक यांनी निकाल देत जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी दिलेला निकाल रद्द ठरवित त्या सहाही नगरसेवकांना पात्र ठरविले आहे तर उलटपक्षी जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी दिलेला निकाल हा प्रकरणाशी संबंधीत नसल्याचे लक्षात आल्यावरून सदर प्रकरण पुनर्निर्णयासाठी जिल्हाधिकारी बुलडाणा यांचेकडे परत पाठविले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी निकाल देतांना ६ नगरसेवकांना अपात्र ठरविणारा आदेश रद्द करीत कायद्याच्या नियम ७ अंतर्गत दिलेल्या तरतुदी नुसार दोषारोप पत्र जिल्हाधिकारी यांनी ६ नगरसेवकांना दिले नाही, त्यामुळे चुकीच्या पद्धतीने आरोपपत्र दिल्याने नगरसेवकांना योग्य पध्दतीने बाजू मांडता आली नाही, त्यामुळे जिल्हाधिकारी यांचानिर्णय चुकीचा ठरवून तो रद्द केला आणि प्रकरण परत निर्णयाकरिता जिल्हाधिकारी यांचेकडे पाठविले.

प्रकरणात केलेले दोषारोप आणि निकाल यामध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आल्यावरून उच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. आता जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात २६ आॅगस्टपासून हे प्रकरण सुरू होणार असून ३१ आॅक्टोंबर २०१६ पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय द्यावा असे न्यायालयाने आदेशीत केले आहे. या प्रकरणातील शैलेंद्र पाटील यांच्यासह नगरसेवक संदीप काळे, रविंद्र रायणे, सौ.रूपाली दिनेश शिंदे, सौ.उषा विठ्ठल डाबेराव, सौ.ज्योती विजय गणोरकार हे नगरसेवक पात्र ठरलेले आहेत. तर नगराध्यक्षा सौ. कलोरे यांच्यासह चौघांविरोधात सुरू असलेल्या अपात्रता प्रकरणाचा निकाल बुधवारी लागण्याची शक्यता आहे. शैलेंद्र पाटील यांच्याकडून अ‍ॅड.प्रदिप क्षीरसागर, अ‍ॅड.अजय घारे, अ‍ॅड.संदीप चोपडे यांनी तर नगराध्यक्षा सौ.कलोरे यांच्याकडुन अ‍ॅड.भंडारकर यांनी काम पाहिले.