शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
2
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
3
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
4
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
5
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

शीना हत्याकांड; तपास राकेश मारियांकडेच

By admin | Updated: September 10, 2015 04:44 IST

सध्या गाजत असलेल्या शीना बोरा हत्याकांडाचा तपास मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या नेतृत्वात कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, तसे अधिकृत

मुंबई : सध्या गाजत असलेल्या शीना बोरा हत्याकांडाचा तपास मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्या नेतृत्वात कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, तसे अधिकृत पत्र मारिया यांना देण्यात आल्याची माहिती बुधवारी गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.मंगळवारी मारिया यांना मुदतपूर्व पदोन्नती देऊन गृहरक्षक विभागाचे महासंचालक पद देण्यात आले. त्यानंतर बक्षी यांनी पत्रकारांशी बोलताना शीना बोरा प्रकरणाचा तपास मारिया यांच्याकडेच राहील, असे म्हटले होते. मात्र त्यावरून बराच गोंधळ निर्माण झाला होता. गृहरक्षक दल आणि मुंबई पोलीस हे पूर्णत: स्वतंत्र कार्यभार असणारे विभाग आहेत. शिवाय दुसऱ्या अ‍ॅथॉरिटीच्या प्रमुखास मुंबई पोलीस दलाशी संबंधित प्रकरणाचा तपास सोपवायचा असेल तर अनेक तांत्रिक बाबींची पूर्तता करावी लागणार आहे. त्यामुळे याबाबतच्या निर्र्णयावर संभ्रम निर्माण झाला होता. शीना बोरा हत्याकांडाचा तपास मारिया यांच्या देखरेखीखाली कायम ठेवण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला आहे. या हत्याकांडाचा तपास करणारे अधिकारी मारिया यांना थेट रिपोर्ट करतील, असेही गृह राज्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. मारिया यांची बदली करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विश्वासात घेतले नसल्याने ते प्रचंड नाराज झाले असल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांच्या धक्कातंत्राचा अनुभव यापूर्वी तीन वेळा शिवसेनेला आला आहे. महापालिका आयुक्तपदावरून सीताराम कुंटे यांची बदली, परिवहन आयुक्त पदावरून महेश झगडे यांची बदली व नवी मुंबई पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांची बदली या तीन बदल्या तडकाफडकी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला होता.राजीनामा देणार नाहीमुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी झाल्यामुळे नाराज झालेले मारिया राजीनामा देणार असल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केले. मात्र राजीनामा देण्याचा कसलाही विचार नसून, नवीन पदावर कार्यरत असल्याचे मारिया यांनी स्पष्ट केले. तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे?शीना बोराच्या हत्याकांडामागे आर्थिक हितसंबंध असल्याची बाब स्पष्ट झाल्याने हे प्रकरण खार पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले जाईल वा प्रसंगी ‘ईडी’कडे सोपवले जाण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.