शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शीना बहिण नव्हे मुलगी- इंद्राणीची कबुली

By admin | Updated: August 27, 2015 09:44 IST

इंग्रजी वृृत्तवाहिनीत मोठ्या पदावर कार्यरत राहिलेल्या इंद्राणी मुखर्जी यांनी त्यांच्या बहिणीची नव्हे तर मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २६ - इंग्रजी वृृत्तवाहिनीत मोठ्या पदावर कार्यरत राहिलेल्या इंद्राणी मुखर्जी यांनी त्यांच्या बहिणीची नव्हे तर मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. शीना बोहरा ही इंद्राणी मुखर्जी यांच्या पहिल्या पतीपासून झालेली मुलगी होती. इंद्राणी मुखर्जी, त्यांचे पहिले पती संजय खन्ना व चालक श्याम रॉय या तिघांनी शीनाची हत्या केल्याची माहिती मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. 

मुंबई पोलिसांनी मंगळवारी इंद्राणी मुखर्जी व त्यांचा चालक श्याम रॉय या दोघांना शीना बोहरा यांच्या हत्येप्रकरणी अटक केली होती. तीन वर्षांपूर्वी शीना बोहरा यांचे अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. शीना यांचा मृतदेह रायगड येथे पुरण्यात आला होता. खार पोलिसांना एका खब-यामार्फत इंद्राणी यांचा ड्रायव्हर श्याम हा मोठ्या गुन्ह्यात सहभागी असल्याची माहिती मिळाली व या गुन्ह्याला वाचा फुटली. पोलिसांनी श्यामची कसून चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. इंद्राणी यांचे पती पीटर मुखर्जी हे स्टार इंडियाचे सीईओ होते. पीटर व इंद्राणी यांचा हा दुसरा विवाह असून २००२ मध्ये दोघेही विवाहबद्ध झाले होते.  

पोलिस चौकशीत इंद्राणी यांनी शीना बोहरा ही बहिण नव्हे तर मुलगी असल्याची माहिती दिली आहे. शीना ही इंद्राणी यांच्या पहिल्या पतीपासून झालेली मुलगी होती. हत्येचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.  मुंबई पोलिसांच्या पथकाने इंद्राणी यांचे पहिले पती संजय खन्ना यांना कोलकात्यातून अटक केली आहे. २४ एप्रिल रोजी इंद्राणी यांनी वाद मिटवण्यासाठी शीनाला वांद्रा येथे बोलवले होते. गाडीतच शीनाचा गळा आवळून हत्या करण्यात आली होती. यानंतर तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता अशी माहिती राकेश मारियांनी बुधवारी संध्याकाळी एका पत्रकार परिषदेत दिली. 

 शीना व इंद्राणीच्या नात्याची माहिती नव्हती - पीटर मुखर्जी 

इंद्राणी मुखर्जी यांचे पती पीटर मुखर्जी यांनी शीना व इंद्राणीच्या नात्याविषयी माहिती नसल्याचे सांगितले. इंद्राणीने शीनाची ओळख बहिण म्हणून करुन दिली होती असा दावा पीटर यांनी केला आहे. इंद्राणीने मला अंधारात ठेवले असून याचा मला धक्का बसला आहे असेही त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.