शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

शीना बोरा हत्या, श्यामवर रायला बनायचेय माफीचा साक्षीदार

By admin | Updated: May 11, 2016 16:03 IST

शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी श्यामवर रायने विशेष सीबीआय न्यायालयासमोर माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवली आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ११ - शीना बोरा हत्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या गुन्ह्यातील आरोपी श्यामवर रायने विशेष सीबीआय न्यायालयासमोर माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवली आहे. गुन्ह्या संदर्भात मला महत्वाचे खुलासे करायचे असून, मला माफीचा साक्षीदार बनायचे आहे असे मागच्या आठवडयात श्यामवर रायने न्यायालयाला लिहीलेल्या दोन पानी पत्रात म्हटले आहे. 
 
विशेष न्यायाधीश एच.एस.महाजन यांनी रायला आरोपीच्या पिंज-यात बोलावले तेव्हा त्याने गुन्ह्यासंदर्भात आपल्यावर काय आरोप आहेत त्याची मला कल्पना आहे. मी सुद्धा गुन्ह्यात सहभागी होतो असे त्याने सांगितले. न्यायाधीशांनी त्याला गुन्ह्यासंदर्भात विचारले तेव्हा त्याने शीनाची गळा आवळून हत्या केल्याचे न्यायालयाला सांगितले. 
 
मी कुठल्याही दबावाखाली नाही किंवा मला कोणाचीही भिती नाही. मला आता पश्चाताप होत आहे असे श्यामवर रायने म्हटले आहे. रायने माफीचा साक्षीदार बनण्यासाठी जो अर्ज केला आहे त्यावर न्यायालयाने सीबीआयला १७ मे च्या सुनावणीत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणात रायला ऑगस्ट २०१५ मध्ये सर्वात पहिली अटक झाली होती.