शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शीना बोरा हत्याकांड; पीटर मुखर्जीच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

By admin | Updated: December 28, 2015 19:06 IST

बहुचर्चित शीना बोरा हत्याप्रकरणी सीबीआयाने अटक केलेल्या पीटर मुखर्जीच्या न्यायालयीन कोठडीत आज ११ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १४ - बहुचर्चित शीना बोरा हत्याप्रकरणी सीबीआयाने अटक केलेल्या पीटर मुखर्जीच्या न्यायालयीन कोठडीत आज (सोमवारी) ११ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. शीना बोराच्या हत्येचा कट करणाऱ्या चार प्रमुख आरोपींपैकी एक पीटर मुखर्जी आहेत. पीटर मुखर्जीच्या न्यायलयीन कोठडीत वाढ होण्याची ही पाचवी वेळ आहे. यापूर्वी १४ डिसेंबरला झालेल्या न्यायलयीन खटल्यात २८ डिसेंबर पर्यंत वाढ करण्यात आली होती. आज ती वाढून ११ जानेवारीपर्यंत केली आहे.

शीना बोरा हत्याकांडामध्ये आर्थिक हितसंबंध असून त्या दिशेने तापस करण्यासाठी पीटर यांची आणखी चौकशी करावी लागेल हा सीबीआयचा युक्तिवाद कोर्टाने मान्य केला आहे.शीना बोराच्या हत्येमागे आर्थिक व्यवहार कारणीभूत असल्याचा दावा सीबीआयने केला आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये पीटर आणि इंद्राणीची मालमत्ता आहे. मात्र या मालमत्तेबाबत दोघांकडूनही पुरेशी माहिती मिळालेली नाही. तसेच शीनाच्या एचएसबीसी बँकेच्या खात्यात पैसे ठेवण्यात आल्याचा अंदाज असून याप्रकरणी एचएसबीसी बँकेच्या खात्यासंदर्भातील माहिती मिळविण्यासाठी इंटरपोलकडे मागणी केली आहे. काय आहे प्रकरण? -२४ एप्रिल २०१२ रोजी शीना बोराची गळा आवळून हत्या केल्याची कबुली इंद्राणीच्या ड्रायव्हरने दिली होती. गाडीमध्ये गळा आवळून शीनाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पेट्रोल टाकून तिचा मृतदेह रायगडजवळ जाळण्यात आला. शीनाची हत्या झाली, त्यावेळी इंद्राणी गाडीत असल्याची माहितीही ड्रायव्हरने दिली आहे. शीनाचा मृतदेह २३ मे २०१२ रोजी रायगडजवळ आढळून आला होता.हत्येप्रकरणी आधी शीनाची आई इंद्राणीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना याला कोलकातामधून अटक झाली होतीअपहरण आणि कारमध्येच हत्यावांद्र्याच्या नॅशनल कॉलेजबाहेरुन शीना बोराचं अपहरण करुन कारमध्येच गळा आवळून तिची हत्या केली. वाद मिटवण्यासाठी इंद्राणीने शीनाला मेसेज करुन वांद्र्याला बोलावलं होता, असं म्हटलं जात आहे.पतीची फसवणूकइंद्राणी मुखर्जीने पती पीटर मुखर्जी यांनाही अंधार ठेवल्याचं आता उघड झालं आहे. पहिलं लग्न लपवण्यासाठी, स्वत:च्या मुलीला बहिण सांगून, इंद्राणीने पती पीटर यांना अंधारात ठेवलं होतं.इंद्राणीची मुलगी आणि पीटर मुखर्जींच्या मुलाचं प्रेमप्रकरणया प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, इंद्राणीची मुलगी शीना आणि पीटर मुखर्जींच्या मुलाचं प्रेमप्रकरण होतं. म्हणजे इंद्राणी आणि पीटर या पती-पत्नींच्या मुलांचे आपापसात प्रेमसंबंध होते.त्या माय-लेकीचशीनाचा भाऊ मिखाईल बोरानेही शीना आणि इंद्राणी या माय-लेकीच असल्याचा दावा केला आहे.