शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

ती हत्या ‘आॅनर किलिंग’

By admin | Updated: November 7, 2014 00:46 IST

माहूर येथील रामगड किल्ल्यावर प्रेमी युगुलाची झालेली हत्त्या आॅनर किलिंगचा प्रकार असल्याचे उघड झाले आहे. सुपारी देऊन हत्या केल्याचे पुढे आले असून नांदेड पोलिसांनी मुलीचे वडील, काका,

माहूर येथील शाहरूख-निलोफर दुहेरी हत्याकांड माहूर/पुसद (यवतमाळ) : माहूर येथील रामगड किल्ल्यावर प्रेमी युगुलाची झालेली हत्त्या आॅनर किलिंगचा प्रकार असल्याचे उघड झाले आहे. सुपारी देऊन हत्या केल्याचे पुढे आले असून नांदेड पोलिसांनी मुलीचे वडील, काका, चुलत भावासह दोन मध्यस्थांना अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या ११ झाली आहे. वडील मिर्झा खालिद बेग कमर बेग (४८) रा.गांधीनगर पुसद, काका नबाब जानी कमर बेग (५५), चुलत भाऊ विकार अहेमद नबाब जानी बेग (२८) दोघेही रा.फुलसावंगी ता.महागाव आणि मध्यस्थ अभियंता कंत्राटदार सैयद अन्वर अली सत्तार अली (४४) रा.मजिद वॉर्ड, पुसद, कैसर मिर्झा बहद्दूर मिर्झा (४४) रा.माहूर जामा मशिदच्या मागे अशी आरोपींची नावे आहे. त्यांना बुधवारी सायंकाळी नांदेड पोलिसांनी अटक केली. तर यापूर्वी सुपारी घेणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात मुलीचे वडील, काका, चुलत भाऊ आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने हा प्रकार आॅनर किलिंगचा असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. पुसद येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी निलोफर खालिद बेग आणि तिचा प्रियकर शाहरूख फिरोज खान पठाण रा.उमरखेड या दोघांची १० सप्टेंबर रोजी माहूर येथील रामगड किल्ल्यात निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्ती दरवाजाजवळ या दोघांचेही मृतदेह आढळले होते. डोक्यात, मानेवर व गळ्यावर तीक्ष्ण हत्याराचे वार होते. परंतु त्यावेळी नेमके आरोपी कोण, हे कळायला मार्ग नव्हता. आरोपींचा शोध लागत नसल्याने नांदेड पोलीस अधीक्षकांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला. त्यानंतर तब्बल दीड महिन्याने २८ आॅक्टोबर रोजी पोलिसांनी राजू ऊर्फ राजा रघुनाथ गाडेकर, शेख जावेद ऊर्फ पेंटर शेख हुसेन, रंगराव शामराव बाबटकर, शेषराव ऊर्फ पिंटू शामराव बाबटकर, कृष्णा ऊर्फ बाबू मारोतराव शिंदे यांना अटक केली. त्यांची कसून चौकशी सुरू झाली. मात्र यातील मुख्य सूत्रधार रघुनाथ ऊर्फ रघू डॉन ऊर्फ रघू रोकडा नाना पळसकर हा पसार होता. त्याला २ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. या सर्वांची कसून चौकशी केली असता त्यांनी सुपारी घेऊन खून केल्याची कबुली दिली. तसेच गुन्ह्यात वापरलेले शस्त्र आणि इतर साहित्यही काढून दिले होते.त्यावरून पोलिसांनी सुपारी देणाऱ्यांचा शोध जारी केला. दरम्यान, सैयद अन्वर अली आणि कैसर मिर्झा या दोघांना संशयावरून ताब्यात घेतले. परंतु या हत्त्याकांडाचे गूढ उकलत नव्हते. शेवटी पोलिसी खाक्या दाखविताच या हत्याकांडाचे गूढ उकलले. दरम्यान, या प्रकरणात अटक केलेल्या वडिलांसह पाच आरोपींना नांदेड पोलिसांनी गुरुवारी न्यायालयापुढे हजर केले. सदर गुन्ह्यात आरोपींनी रचलेल्या कटाबाबत माहिती हस्तगत करणे, पैशाचा पुरवठा कोणी केला, आणखी या कटात कोण सहभागी आहेत, याचा तपास सुरू आहे. (वार्ताहर)