शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ जमीन लाटण्याचा प्रयत्न

By admin | Updated: July 23, 2016 04:07 IST

देवस्थान व्यवस्थापन समितीच्या शाहूवाडी तालुक्यातील एक हजार एकर शेतजमिन लाटण्याचा प्रयत्न झाल्याचे ‘सीआयडी’ चौकशीत निष्पन्न झाले

एकनाथ पाटील,

कोल्हापूर- प.महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या शाहूवाडी तालुक्यातील एक हजार एकर शेतजमिन लाटण्याचा प्रयत्न झाल्याचे ‘सीआयडी’ चौकशीत निष्पन्न झाले आहे. देवस्थान सचिव शुभांगी साठे यांच्यासह समिती सदस्यांच्या समितीच्या लेटरपॅडवर बोगस सह्या व शिक्के मारून मुंबईतील देव रिर्सोसेस इंडिया व एन. एस. कुंभार ट्रेडर्स अँड मिनरल्स पेठवडगाव या कंपन्यांच्या नावे ही जमीन चढविण्याचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात या दोन कंपन्यांसह अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार समितीच्या शिवाजी पेठेतील कार्यालयात झाल्याने समितीचे अठरा सदस्य व कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. या समितीवर पदे भूषविलेल्या काही सदस्यांनी चौकशी होऊ नये, यासाठी पोलिसांच्या भोवती ‘राजकीय फिल्डिंग’ लावली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थान समितीकडे पश्चिम महाराष्ट्रातील ३०६५ मंदिरे आणि त्यांच्या संपत्तीचे व्यवस्थापन आहे. समितीकडे २५ हजार एकर शेतजमीन आहे. या जमिनीचा गैरव्यवहार झाल्यासंबंधीची वृत्तमालिका ‘लोकमत’ मध्ये प्रसिध्द झाल्यावर घोटाळा प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिले होते. >देवस्थान समितीची शाहूवाडी तालुक्यातील शेतजमिन लाटण्याचा प्रयत्न झाला आहे हे खरे आहे. आरोपींनी माझ्यासह समितीच्या सदस्यांच्या बोगस सह्या केल्या आहेत. आम्ही रितसर तक्रार दिली असून पोलिस तपास करीत आहेत. - शुभांगी साठे, सचिव, देवस्थान समिती, कोल्हापूर