शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ विद्यार्थिनी आत्मसमर्पणाच्या वाटेवर...

By admin | Updated: December 20, 2015 01:43 IST

भामरागड तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेतून गेल्या वर्षी ३ विद्यार्थिनी पळून जाऊन नक्षल दलममध्ये सामील झाल्या होत्या. त्यातील एक विद्यार्थिनी नक्षलवाद्यांच्या वागणुकीला

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेतून गेल्या वर्षी ३ विद्यार्थिनी पळून जाऊन नक्षल दलममध्ये सामील झाल्या होत्या. त्यातील एक विद्यार्थिनी नक्षलवाद्यांच्या वागणुकीला कंटाळून लवकरच आत्मसमर्पण करणार आहे. मात्र तिच्याबरोबरच्या दोन मुली अद्याप नक्षली चळवळीतच आहेत.भामरागड तालुक्यातील लाहेरी आश्रमशाळेचे ६ विद्यार्थी गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला शाळेतून बेपत्ता झाले होते. त्यानंतर तिघांचा शोध लागला. मात्र ३ मुली सापडल्या नव्हत्या. साधारणत: तीन महिन्यांपूर्वी माओवाद्यांच्या संघटनेकडून एक पत्रक जारी करण्यात आले. त्यात या ३ विद्यार्थिनी नक्षली चळवळीत सामील झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यातीलच सातवीत शिकणारी १५वर्षीय सविता (नाव बदलले आहे) ही छत्तीसगड राज्यात गेल्या वर्षभरापासून दलममध्ये काम करीत होती. दलममधील कार्यपद्धतीला कंटाळून व नक्षल्यांच्या अत्याचारामुळे ती तेथून बाहेर पडली. तिला भामरागड पोलीस पथकातील हवालदार संतोष मंथनवार, त्यांचे सहकारी व जिल्हा पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जंगलातून अभियानादरम्यान ताब्यात घेतल्याचे कळते. त्यानंतर घाबरलेल्या या मुलीने पोलिसांना आपली आपबिती सांगितली. भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी या तिला धीर दिला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तिच्या आत्मसमर्पणाचा मार्ग मोकळा केला.दोन दिवसांपूर्वी ही १५वर्षीय मुलगी दलममधून बाहेर पडून जंगलात फिरत असल्याचे पोलिसांना दिसले. तिच्या इच्छेनुसार आत्मसमर्पणाची प्रक्रिया पोलीस प्रशासन स्तरावर सुरू आहे.- संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड