शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे अपघाताबाबत "ती" अफवाच !

By admin | Updated: May 9, 2017 20:49 IST

कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दिवा-सावंतवाडी रेल्वेला भीषण अपघात झाल्याची पोस्ट गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाली

ऑनलाइन लोकमतरत्नागिरी/सिंधुदुर्ग, दि. 9 - कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दिवा-सावंतवाडी रेल्वेला भीषण अपघात झाल्याची पोस्ट गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. मात्र अपघाताबाबतची ही पोस्ट धादांत खोटी आहे. अशी अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करणे हा गुन्हा असून, अफवा पसरवणारी पोस्ट सर्वप्रथम टाकणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. या प्रकारच्या अफवा कोणीही पसरवू नये, असे आवाहन कोकण रेल्वेमार्फत करण्यात आले आहे.गेल्या दोन वर्षांच्या काळात सोशल मीडिया अधिक कार्यरत झाले आहे. त्यामुळे कोणीही या माध्यमातून आपले विचार, बातम्या पोस्ट करून त्या सर्वदूर पोहोचवू शकतात. परंतु या माध्यमाचा गैरफायदाही घेतला जात आहे. या माध्यमांतून पोस्ट टाकून काही विघ्नसंतोोषी लोक अफवा पसरवित असून, त्यामुळे समाजात संभ्रमाचे, संशयाचे वातावरण निर्माण केले जात आहे. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दिवा-सावंतवाडी रेल्वे गाडीला नागोठणेजवळ निगडी येथे भीषण अपघात झाल्याची खोटी बातमीही अशीच अफवा ठरली आहे.दोन वर्षांपूर्वी नागोठणेजवळ झालेल्या अपघाताची बातमी आता अपघात झाला अशा स्वरूपात सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसात फॉर्वर्ड केली जात आहे. त्यावेळचे अपघाताचे फोटोही पोस्ट करण्यात आले आहेत आणि आताच अपघात झाला, अशी अफवा पसरवण्यात आली. त्यामुळे या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या कुटुंबीयांची नाहक घालमेल झाली. अनेकांनी रेल्वे आणि अन्य ठिकाणी फोन करून याबाबत खातरजमा करून घेतली. मात्र असे विघातक कृत्य करणाऱ्यांना शोधून त्यांना चांगली अद्दल घडवली पाहिजे, अशी लोकांची मागणी असून आता कोकण रेल्वे याबाबत काही कृती करणार काय, अफवा पसरवणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल होणार काय आणि त्याच्यापर्यंत पोहोचून त्याला शिक्षा होणार की नाही, असे सवाल केले जात आहेत.