शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ मात्र घेतेय स्वच्छतागृहांचा शोध

By admin | Updated: January 18, 2017 01:35 IST

भिगवण परिसरात महिलांनी स्वच्छतागृहांचा शोध घेऊ पाहिल्यास त्यांना एकही स्वच्छतागृह नसल्याचे दिसून येते.

भिगवण : भिगवण परिसरात महिलांनी स्वच्छतागृहांचा शोध घेऊ पाहिल्यास त्यांना एकही स्वच्छतागृह नसल्याचे दिसून येते. त्यामुळे भिगवण गावात महिलांचे हाल होत आहेत. २० हजारांच्या पर्यंत असणाऱ्या आणि भिगवणसारख्या गावात महिलावर्गासाठी एकही स्वच्छतागृह नसल्याने महिलांना खूप हाल सहन करावे लागत आहेत. भिगवण ११ हजार अधिकृत आणि २० हजारच्या पुढे प्रत्यक्षात लोकसंख्या असणारे गाव; तर व्यापारी आणि शिक्षणासाठी रोज गावाला भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या हजाराच्यावर आहे. उजनीच्या किनारी वसलेलं राहणीमान शहरीकरणाकडे झुकणारे असले तरी खेड्यात गणले जाणारे गाव. पुणे-सोलापूर महामार्गाच्या कडेला वसलेलं गाव असल्याकारणाने या ठिकाणी मोठी बाजारपेठ विकसित झालेली आहे. दळणवळणची सोय चांगली असल्याने परिसरातील नागरिक खरेदीसाठी याच गावाला प्राधान्य देताना दिसून येतात. आता खरेदी करायची म्हटले, की स्त्रियांना सोबत घेतलेच जाते. परंतु भिगवणसारख्या बाजारपेठेत महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची वानवा आहे. दिवसभर खरेदी करण्यासाठी आलेल्या ‘ति’ला कुचंबणा सहन करीत खरेदी करावी लागते, तर यातूनच शारीरिक व्याधींचा सामना करावा लागतो.सरकारने तिला ५० टक्के आरक्षण देऊन समाजात पदे दिली; परंतु तिला लागणाऱ्या रोजच्या गरजांसाठी मात्र कोणतीही साधने उपलब्ध करून दिली नाहीत. तसे पाहिले तर भिगवणवर सरपंच महिला असतानासुद्धा या बाबींकडे लक्ष दिले जात नसल्याचेच दिसून येत आहे. मंदिराचे सभागृह, समाजमंदिरे, शादीखाने, शाळांची कुंपणे करण्यास निधी देणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना महिलांसाठी आवश्यक असणाऱ्या स्वच्छतागृहांना निधी आणि जागा उपलब्ध करणे अवघड आहे का, असा सवाल मात्र ती काय करते, असे वाटणाऱ्या समाजाला पडत नाही का. रोटरी क्लब, नेचर फाऊंडेशन अशा सामाजिक संघटना हे कार्य करताना दिसत असले तरी शासन गांभीर्याने याकडे पाहत नाही तोपर्यंत समस्त ती कुचंबणा सहन करणार हे नक्की.>चाळीस वाड्या-वस्त्या आणि चार तालुक्यांना जोडणाऱ्या भिगवण गावात पुरुषांसाठीच स्वच्छतागृह नसल्याने महिला स्वच्छतागृहाची कल्पनाच न करणे योग्य. १०० च्या आसपास गाळे बांधून व्यवसायासाठी भाड्याने देऊन करोडो रुपयांचे डिपॉझिट घेऊन लाखो रुपयांचे भाडे कमाविणाऱ्या इंदापूर बाजार समितीला एक सुलभ शौचालय बांधणे अशक्य आहे का? भिगवण, तक्रारवाडी, मदनवाडी, कुंभारगाव या सर्व गावच्या सरपंच महिला असून ५० टक्के सदस्य असून ग्रामपंचायत स्वत:साठीसुद्धा स्वतंत्र स्वच्छतागृहाची निर्मिती करताना दिसून येत नाही.