शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या खून करणा-या पतीला जन्मठेप

By admin | Updated: August 26, 2016 21:18 IST

सासुरवाडीकडून पैसे मिळाले नसल्याच्या रागातून तसेच चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून करणा-या तिच्या पतीला अतिरिक्त जिल्हा

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 26 - सासुरवाडीकडून पैसे मिळाले नसल्याच्या रागातून तसेच चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून करणा-या  तिच्या पतीला  अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यु. एल. तेलगावकर यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
या प्रकरणी वन खात्याचा सुरक्षारक्षक काळू धर्मा राठोड (रा. तिसगाव, ता. औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, ८ जुलै २००९ रोजी चिंचोली शिवारातील सर्व्हे क्रमांक ३८ मधील जंगल परिसरात झाडे लावण्यासाठी खड्डे करताना एका ३० ते ३५ वर्षीय महिलेचा कुजलेला मृतदेह आढळून आला. याची माहिती फियार्दीने खुलताबाद पोलिसांना दिल्यानंतर प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्याच ठिकाणी करण्यात आलेल्या शवविच्छेदनाच्या अहवालात डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर घटनास्थळावरून अडीच किलोंचा दगड जप्त करण्यात आला आणि खुलताबाद पोलिस ठाण्यात कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची माहिती तपास करणारे पोलिस निरीक्षक डी. एम. येरूळे यांनी सर्व पोलिस ठाण्यांना पाठवली. दरम्यान, आपली बहीण गंगासागर मच्छिंद्र सूर्यवंशी  (रा. गडदगव्हाण, ता. चिंतूर, जि. परभणी) ही बेपत्ता असल्याची तक्रार सूर्यकांता जमधडे (रा. पिंपरीलिंग, ता. सेनगाव, जि. हिंगोली) यांनी पोलिस ठाण्यात दिली होती. गावातील लोकांनी गंगासागर गायब झाल्याचे कळविल्यानंतर सूर्यकांता यांनी बहिणीच्या गडदगव्हाण येथील घरी धाव घेतली होती. मात्र बहीण आणि तिचा पती  मच्छिंद्र उकंडी सूर्यवंशी (३५) हादेखील घरी नसल्याचे लक्षात आल्यानंतर सूर्यकांता यांनी ‘मिसिंग’ची तक्रार दिली होती. आरोपी त्याच्या मामाच्या शेतात असल्याची खबर मिळाल्यानंतर, पोलिसांनी आरोपीच्या मामाला नोटीस देऊन आरोपीला हजर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आरोपी ठाण्यात हजर होऊन चौकशीदरम्यान त्याने आपल्या पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. तसेच मृत गंगासागर हिचे कपडे, दागिने तिची बहिणी सूर्यकांता हिने ओळखले. या प्रकरणी सुनावणीदरम्यान, सहाय्यक सरकारी वकील बी. आर. लोया यांनी ११ साक्षीदारांचेजबाबनोंदविले यामध्ये मृताची बहीण, डॉक्टर, सोनार यांची साक्ष महत्वाची ठरली. आरोपीची कबुली तसेच सर्व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयानेआरोपी पतीला कलम ३०२ अन्वये जन्मठेप व एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. 
आरोपी व मृत गंगासागर यांचा विवाह १९९३ मध्ये झाला होता. त्यावेळी सासुरवाडीकडून २० हजार रुपये न मिळाल्याचा राग आरोपीच्या मनात होता. त्यावरुन आरोपीचे पत्नीच्या भावाशी भांडण झाले होते व आरोपी पत्नीला सतत त्रास देत होता. तसेच आरोपी नाशिकला कामाला गेला असता, तो पत्नीला बसस्थानकावरच सोडून परतला होता. त्यावेळी गावाकडील एकाने गंगासागर हिला पैसे देऊन माहेरी पाठवले होते. त्यानंतर गंगासागर चार वर्षे माहेरी राहात होती. मात्र आरोपीच्या भावाने समझोता घडून आणल्यानंतर व यापुढे कोणताही त्रास होणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतर गंगासागरला आरोपीकडे पाठवण्यात आले होते. मात्र चारित्र्याच्या संशयावरून आरोपी पत्नीचा त्रास देत होता व दुसº्या लग्नाच्या हेतुने त्याने पत्नीचा खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले.