शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

हाता-पायांविना तिने केली कमाल !

By admin | Updated: June 7, 2016 15:19 IST

दैवाने जरी केली अवकृपा, तरीही ना कधी डगमगले। जिद्द एकचि मनी राखिली, यश खुणावतेय पुढे पुढे।।

- विलास जळकोटकर

सोलापूर, दि. ०७ -  दैवाने जरी केली अवकृपा,तरीही ना कधी डगमगले।जिद्द एकचि मनी राखिली,यश खुणावतेय पुढे पुढे।।मध्यमवर्गीय कुटुंब... परिस्थितीही तशी बेताचीच... आई घरोघरी पायपीट करुन डाळिंब विकते. वडिलांचा कापडाचा जेमतेम छोटासा व्यापार... पोटी जन्मताच हात आणि पाय नसलेल्या कन्येचा जन्म झाला... पण माऊली हटली नाही. पदरी मिळालं पवित्र झालं मानून घेत अशातही या पोरीला ममतेनं वाढवलं. नावही तिचं ममताच ठेवलं. याच ममतानं आईच्या श्रमाच्या घामाचं चिज करीत हात-पाय नसल्याचा न्यूनगंड न बाळगता अतूट इच्छाशक्तीच्या बळावर यंदाच्या दहावीच्या परीक्षेत चक्क ६६.६० टक्के गुण मिळवून चार चाँद लावले आहेत.गुरुनानक चौक परिसरातील कुर्बान हुसेन नगर मध्ये राहणारे सरला आणि चंदुलाल थदानी यांना पहिलेच अपत्य असलेली कन्या ममता जन्मताच अपंग म्हणून जन्माला आली. परिस्थितीने नाडलेल्या थदानी कुटुंबीयांना हा धक्का होता. पण यातूनही ते सावरले. आई सरला हटली नाही. ममतेने तिला खूप मोठं करण्याचा निर्धार केला. शाळेत जाण्याचं तिचं वय होताच अनेक खटपटी करुन तिनं प्रकाश यलगुलवार यांची भेट घेतली. तिला शाळेत घेण्याची विनंती केली अन् चंद्रभागाबाई यलगुलवार प्रशालेतून तिच्या शाळेचा श्रीगणेशा सुरु झाला. अगदी दहावीपर्यंत कोणत्याही प्रकारच्या पैशाविना तिचं शिक्षण पार पडलं.शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या ममताच्या अंगी अभ्यास आणि कोणत्याही गोष्टीमध्ये मात्र विशेष रस होता हे जाणवल्यामुळेच लहानपणापासूनच तिच्यावर विशेष लक्ष ठेवले... ममताची आई सांगत होती. दिवसभर डाळिंब विकण्यासाठी बाहेर पडावं लागायचं. तिच्या वडिलांचाही कापडाचा छोटा व्यापार असल्यानं शाळेत जाण्यासाठी दररोज रिक्षा लावली. घरात मावशी सारं काही बघायची. आज दहावीच्या परीक्षेला पोरीनं आपल्या अपंगत्वावर मात करीत ६६ टक्के गुण मिळवले यासारखा आनंद माझ्या आयुष्यात कोणताच नसल्याचे भावोद्गारही आई सरितांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना काढले.

साहेब, मी कलेक्टर होणार 

तत्कालिन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांच्या उपस्थित कार्यक्रमाच्यावेळी एकदा चिमुकल्या दिसणाऱ्या ममताची भेट झाली. तिची चुणचुणीत, कुशाग्र बुद्धिमत्ता आणि धीटपणा पाहून गेडाम भारावले. सहजच त्यांनी तिला बाळा तू काय होणार असे विचारले. तिने कोणताही विचार न करता ताडकन् साहेब मी कलेक्टर होणार! खूप शिकणार आणि आई-वडिलाचं नाव मोठ्ठं करणार असे उत्तर दिले होते याची आठवण आई सरितांनी यावेळी करुन दिली. आज ( सोमवारी) ह्यलोकमतह्णशी बोलतानाही तिने आपल्या ध्येयाचा पुनरुच्चार केला.

आई माझी गुरु !

जन्मताच मी अपंग म्हणून जन्मले तरी आईने मोठ्या मायेने वाढवून शिकण्यासाठी माझ्यामध्ये जिद्द निर्माण केली. यामुळे आई हीच माझी सर्वप्रथम गुरु असल्याची प्रांजळ कबुली ममताने यावेळी दिली. आपल्या या यशामध्ये यलगुलवार प्रशालेचे सर्व शिक्षक आणि ड्रीम फाउंडेशनचे काशिनाथ भतगुणकी आणि संगीता भतगुणकी यांनी माझ्यामध्ये आत्मविश्वास जागवला. यामुळेच मी यश मिळवू शकले. आता कलेक्टर झाल्याशिवाय मागे वळायचे नाही असा निर्धार ममताने व्यक्त केला.