शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शरद राव म्हणजे संघटन आणि संघर्ष

By admin | Updated: September 21, 2016 02:33 IST

शरद राव यांनी कामगार चळवळीत काम करताना संघटन आणि संघर्षाचा आदर्श घालून दिला आहे.

मुंबई : शरद राव यांनी कामगार चळवळीत काम करताना संघटन आणि संघर्षाचा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या पुढील पिढीनेही त्यांनी घालून दिलेल्या आदर्शाचा अवलंब करीत कामगारांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घ्यावी. या संघर्षात आम्ही त्यांच्यासोबत राहू, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मंगळवारी म्हटले. ज्येष्ठ कामगार नेते दिवंगत शरद राव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मंगळवारी दादर येथील राजा शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शरद पवारांसह उद्योगमंत्री सुभाष देसाई, शेकाप नेते जयंत पाटील, मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार, कामगार नेते विश्वास उटगी यांच्यासह मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग उपस्थित होता. या वेळी शरद पवार म्हणाले की, शरद राव यांच्या शोकसभेस उपस्थित राहावे लागेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. राव यांनी संपूर्ण आयुष्य संघर्षात घालविले. कामगार चळवळीत काम करताना संप कधी पुकारायचा आणि तो कधी आवरता घ्यायचा, याचे अचूक टायमिंग शरद रावांकडे होते, अशा भावना शरद पवार यांनी व्यक्त केल्या. ज्या काळात कामगार नेते म्हणजे सोन्याची चैन, लॉकेट आणि पंचतारांकित राहणीमान बनले होती त्या काळातही शरद राव यांनी आपल्या साधेपणाने आदर्श घालून दिला होता. नोकरी आणि घर या मध्यमवर्गीय मानसिकतेला छेद देत शरद राव यांनी कामकार चळवळीत पूर्णवेळ काम केले, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी भावना व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)