शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांनी केले आमदारांच्या वेतनवाढीचे समर्थन

By admin | Updated: August 7, 2016 20:40 IST

मंत्री आणि आमदारांना मिळणाऱ्या वेतनाची सांगड सचिवांच्या वेतनाशी घालण्यात आल्याने त्यांची घसघशीत वेतनवाढ झाली आहे.

ऑनलाइन लोकमतउस्मानाबाद, दि. 7-  मंत्री आणि आमदारांना मिळणाऱ्या वेतनाची सांगड सचिवांच्या वेतनाशी घालण्यात आल्याने त्यांची घसघशीत वेतनवाढ झाली आहे. या वेतनवाढीचे शरद पवारांनी रविवारी समर्थन केले. आमदारांना कराव्या लागणाऱ्या खर्चाची मांडणी करीत मला वृत्त वाहिन्यांच्या अँकर्स, संपादकांच्या पगारींचाही आकडा माहिती असल्याचे ते मश्किलपणे म्हणाले. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी केलेल्या ‘गोरक्षक नव्हे समाजकंटक’ या वक्तव्यावर या गोरक्षकांना इतके दिवस कोणाचा आशीर्वाद होता, असा टोलाही त्यांनी लगावला. पंतप्रधान मोदींनी शनिवारी गोरक्षणाच्या नावाखाली अनेकांनी स्वत:ची दुकानदारी थाटली असल्याचे वक्तव्य करीत हे गोरक्षक नव्हे तर समाजकंटक असल्याचे वक्तव्य केले होते. याबाबत शरद पवार यांना विचारले असता अलिकडील काळात गोरक्षक ही नवाच प्रकार पुढे आला आहे. मात्र, या गोरक्षकांना इतके दिवस कोणाचा आशीर्वाद होता? या विषयावर यापूर्वीच ते बोलले असते तर हा प्रकार इतका वाढला नसता. उशिरा का होईना मोदी बोलले आहेत. मात्र, गोरक्षक सुधारतील यावर आपला विश्वास नसल्याचे ते म्हणाले. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. सरकारचे नियंत्रण आणि दरारा नसल्यानेच हा प्रकार घडत असल्याचे ते म्हणाले. गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी स्वतंत्र गृहमंत्री नियुक्त करण्याची आवश्यकता आहे का? या प्रश्नावर मी बोलणे योग्य नाही, कारण मी मुख्यमंत्री असतानाही माझ्याकडेच गृहविभाग होता. आजवरच्या काळकिर्दीत एकटे जयंतराव पाटील हे स्वतंत्र गृहमंत्री होते. मात्र, वाढत्या गुन्हेगारीबाबत मी एवढेच म्हणेण की, गृह खात्याचा कारभार अधिक निगराणीने पाहणाऱ्या व्यक्तीची आज गरज आहे. मध्यंतरी कोपर्डी येथील घटनेनंतर शरियत कायद्यानुसार शिक्षा देण्याची मागणी मनसे नेते राज ठाकरे यांनी केली होती. या अनुषंगाने शरद पवार यांना विचारले असता राज ठाकरे काय म्हणाले, ते मला माहित नाही. मात्र, अत्याचाराच्या प्रकरणात शासन, प्रशासनाने वेगाने कारवाई केल्यास अशा घटनांना आळा बसू शकतो, असेही ते म्हणाले. महिलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रशिक्षणमहिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आणि आ. विद्या चव्हाण यांच्या पुढाकाराने काही महिलांचा संच तयार करून मुलींचा आत्मविश्वास वाढविण्याचे प्रशिक्षण घेण्याचे नियोजन केले आहे. त्याची अंमलबजावणी संघटनेमार्फत लवकरच करू, अशी माहितीही शरद पवार यांनी दिली. देशातील गुन्ह्यांची संख्या पाहिली असता त्यात महाराष्ट्र चौथ्या स्थानावर आहे. या यादीत महाराष्ट्र असताच कामा नये. त्यासाठी आपणा सर्वांना महिलांचा सन्मान, समाजामध्ये जागरूकता निर्माण करावी लागेल. महिला अत्याचारासंदर्भातील कायदे सक्षम आहेत, कठोर आहेत. मात्र, शिक्षेचे प्रमाण वाढण्याची आवश्यकताही पवार यांनी व्यक्त केली.