शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस

By admin | Updated: November 25, 2015 03:23 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस, १0 डिसेंबर रोजी दिल्लीतील विज्ञान भवनात सायंकाळी ५.३0 वाजता एका सोहळयात संपन्न होईल.

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस, १0 डिसेंबर रोजी दिल्लीतील विज्ञान भवनात सायंकाळी ५.३0 वाजता एका सोहळयात संपन्न होईल. सोहळयास राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग व काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांचे व पवारांच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मित्रपरिवाराचे अवघे तारांगणच या सोहळयासाठी विज्ञान भवनात लोटणार आहे.या सोहळयाच्या आयोजन समितीने मोदी मंत्रिमंडळातील तमाम मंत्री, सर्व खासदार, दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, ओडिशा, पंजाब, केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही खास निमंत्रणे पाठवली आहेत.पंतप्रधान मोदी आणि सोनिया गांधी कधीही एका व्यासपीठावर एकत्र आलेले नाहीत. पवारांच्या आयुष्यातील या खास सोहळयासाठी हे दोन प्रमुख नेते एका व्यासपीठावर येतील काय? याकडे राजधानीतल्या साऱ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रपती , उपराष्ट्रपती व माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याची स्वीकृती कळवली आहे. तथापि पंतप्रधान मोदी व सोनिया गांधींनी आपली अधिकृत स्वीकृती आयोजन समितीकडे अद्याप पाठवलेली नाही. तरीही सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार पवारांच्या कार्यक्रमासाठी दोघांनीही १0 डिसेंबर रोजी सायंकाळची वेळ राखून ठेवली आहे.अशाच सोहळ््याचे आयोजन दिल्लीखेरीज मुंबई, पुणे व बंगलुरू अशा आणखी ३ ठिकाणी होणार आहे. दिल्लीतील सोहळयाच्या आयोजनाची सूत्रे खासदार प्रफुल पटेल, डी.पी. त्रिपाठी व सुप्रिया सुळे यांच्याकडे आहेत तर पवारांच्या वाढदिवशी म्हणजे दिनांक १२ डिसेंबर रोजी मुंबईत आयोजित सोहळ्याचे संयोजन सुनिल तटकरे व हेमंत टकले करीत आहेत. बंगलुरू येथे १८ डिसेंबर रोजी आयोजित पवारांच्या अमृत महोत्सवाची सोहळयाची सूत्रे माजी मंत्री पी.जी.आर. सिंधिया यांच्याकडे आहेत तर पुण्यात लाखोंच्या उपस्थितीत २0 डिसेंबरला होणाऱ्या अमृत महोत्सवाच्या महासोहळयाच्या आयोजनाचे संचलन पवारांचे निकटवर्ती मित्र विठ्ठल मणियार करीत आहेत. (विशेष प्रतिनिधी)