शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार घेणार नगरसेवकांची शाळा

By admin | Updated: March 2, 2017 03:42 IST

शिवसेना-भाजपाचे वादळ वाहत असतानादेखील त्या वादळातून ठाण्यात मात्र राष्ट्रवादीने दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याचा मान मिळवला

ठाणे : मुंबईसह राज्यात एकीकडे शिवसेना-भाजपाचे वादळ वाहत असतानादेखील त्या वादळातून ठाण्यात मात्र राष्ट्रवादीने दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे या नगरसेवकांचे कौतुक करण्यासाठी आणि सत्ताधाऱ्यांवर वचक कशा पद्धतीने ठेवता येईल, यासाठी कानमंत्र देण्यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे ठाण्यात पुन्हा हजेरी लावणार आहेत. येत्या ६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता ते या नगरसेवकांची शाळा घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली.ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला प्रथमच एकहाती सत्ता मिळाली असून त्यांनी ६७ जागांवर विजय मिळवला आहे. परंतु, मुंबई, ठाणे आणि राज्यातही भाजपाला पोषक असे वातावरण होते. त्यामुळे इतर महापालिकांमध्ये भाजपाने ज्या पद्धतीने मुसंडी मारली, तशीच ठाण्यातही मारली जाईल, अशी हवाच निर्माण झाली होती. परंतु, भाजपाला पोषक असलेल्या राजकीय वातावरणातही ठाण्यात राष्ट्रवादीने ३५ जागांवर यश संपादित केले आहे. त्यामुळे या सर्वांचे कौतुक करण्यासाठी शरद पवार आता ठाण्यात येणार आहेत. तसेच महापालिकेत आता विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याने सत्ताधाऱ्यांच्या एक कलमी कार्यक्रमाला अंकुश कसा घालायचा, यावरदेखील ते मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय, पुढील पाच वर्षे कशा पद्धतीने काम करायचे, यावरदेखील ते भाष्य करणार असल्याचे बोलले जात आहे. ठाण्यात निवडणुकीच्या काळात जी काही गटबाजी उफाळली होती, त्या गटबाजीचाही समाचार घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिली. निवडणुकीच्या काळात कळव्यात आव्हाड विरुद्ध गणेश नाईक गट यामध्ये काही जागांवरून वितुष्ट निर्माण झाले होते. (प्रतिनिधी) >नाईक, डावखरे गट मागेनिवडणुकीच्या प्रत्यक्ष प्रचारातूनदेखील नाईक आणि डावखरे गट पिछाडीवर होते. एकत्रितपणे काम केले असते, तर आणखी काही जागा वाढल्या असत्या, असाही मुद्दा रंगला. त्यामुळे यावरदेखील ते भाष्य करण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.