शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांनी दिल्या नेत्यांना कानपिचक्या

By admin | Updated: January 14, 2016 00:33 IST

जनतेच्या प्रश्नांवर आंदोलने करण्यात पक्षामध्ये सातत्य दिसत नाही, अशी तीव्र नाराजी व्यक्त करीत पक्ष कार्यालयात जा, लोकांमध्ये मिसळा आणि सरकारच्या विरोधात सतत आंदोलनं करा, अशा

मुंबई : जनतेच्या प्रश्नांवर आंदोलने करण्यात पक्षामध्ये सातत्य दिसत नाही, अशी तीव्र नाराजी व्यक्त करीत पक्ष कार्यालयात जा, लोकांमध्ये मिसळा आणि सरकारच्या विरोधात सतत आंदोलनं करा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी स्वपक्षाच्या नेत्यांना कानपिचक्या दिल्याचे समजते.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बुधवारी राष्ट्रवादीच्या निवडक ३० नेत्यांसमवेत पवार यांनी बैठक घेतली. माजी केंद्रीय मंत्री खा. प्रफुल्ल पटेल, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित पवार, विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यावेळी उपस्थित होते. सूत्रांनी सांगितले की सरकारविरोधात आणि जनतेचे प्रश्न घेऊन आंदोलन करण्याबाबत पक्षात सातत्य नसल्याची भावना पवार यांनी बोलून दाखविली. अनेक ठिकाणी पक्षाची कार्यालये आहेत, पण तेथे येऊन बसले पाहिजे. कार्यालय रोज उघडते की नाही, हे पाहिले पाहिजे. कार्यकर्त्यांशी नाळ कायम ठेवण्याचा सल्ला पवारांनी दिला. त्यामुळेच की काय, दुष्काळ, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पक्ष तीव्र लढा उभारेल, असे तटकरे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. (विशेष प्रतिनिधी)लाड यांच्या उमेदवारीने विश्वासार्हतेला धक्का...विधान परिषद निवडणुकीत मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे प्रसाद लाड यांच्या उमेदवारीला पक्षातील काही नेत्यांचे समर्थन असल्याचे चित्र निर्माण झाले आणि त्याचा फटका सोलापूर आणि अकोल्यात राष्ट्रवादीला बसला. या दोन्ही ठिकाणी काँग्रेसने आम्हाला त्यामुळेच साथ दिली नाही, असे पवार म्हणाल्याचे समजते. आगामी काळात विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या जागांसाठी निवडणूक होईल तेव्हा काँग्रेसबरोबर आघाडी करा, असा सल्लाही पवार यांनी दिला.पक्ष भुजबळांच्या पाठीशी : छगन भुजबळ राष्ट्रवादीमध्येच आहेत आणि राहतील. ते पक्षाचे आदरणीय नेते असून, अन्य कोणत्याही पक्षात जाणार नाहीत. त्यांच्यावर होत असलेले आरोप राजकीय स्वरूपाचे आहेत. पक्ष त्यांच्या पाठीशी पूर्णत: उभा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.