शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

सुजय नातवासारखा, शरद पवारांनी आशीर्वाद द्यावेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 05:33 IST

राधाकृष्ण विखे-पाटील : नगरच्या जागेचा तिढा सोडविण्याचे आवाहन

मुंबई : सुजय हा शरद पवारांसाठी नातवासारखा आहे. त्यामुळे त्यांनी नातवाला आशीर्वाद द्यावेत, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सोडविण्याचे आवाहनकेले.

सुजय विखे-पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीने नगरची जागा सोडावी, अशी मागणी होत आहे. राष्ट्रवादीने जागा न सोडल्यास थेट भाजपातून सुजय यांनी निवडणूक लढवावी, अशी भूमिका स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली. तसेच प्रदेश पातळीवरून नगरची जागा सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न होत नसल्याचा आरोपही झाला.

या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट करताना विखे-पाटील म्हणाले की, नगरच्या जागेबाबत दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि प्रभारी मल्लिकार्जुन खर्गेही त्यासाठी प्रयत्नशील आहेत. मी स्वत: शरद पवार यांना या जागेबाबत विनंती केली असून आशावादी असल्याचे विखे-पाटील म्हणाले.काही कार्यकर्त्यांनी भाजपाबाबत वक्तव्ये केली असली तरी ती सर्वांची अथवा पक्षाची भूमिका नाही. काँग्रेस नेता म्हणून पक्षश्रेष्ठीया जागेबाबत जो निर्णय घेतील त्यानुसार सर्व कार्यकर्त्यांना घेऊन काम करणार असल्याचे विखे-पाटील यांनी स्पष्ट केले.पवार-विखे वाद कधीच संपला!पवार आणि विखे-पाटील घराण्यातील वैमनस्यामुळे नगरचा तिढा सुटत नसल्याबाबत विचारले असता, माझे वडील आणि शरद पवारांचे वैचारिक मतभेद होते, संघर्ष होता. माझ्या वडिलांच्या निधनाला आता दोन वर्षे झाली. किंबहुना त्यापूर्वीच तो संघर्ष संपला होता. त्यामुळे शरद पवार यांच्या मनात तसे काही असेल, असे मला वाटत नाही, असे विखे पाटील म्हणाले.