शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ विधान युती तुटावी म्हणूृन- शरद पवार

By admin | Updated: January 31, 2017 02:16 IST

महाराष्ट्रात भाजपाला समर्थन देण्यासंबंधी केलेले विधान हे भाजपा आणि शिवसेना एकत्र येऊ नयेत, यासाठी खेळलेली रणनीती होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे

पणजी : महाराष्ट्रात भाजपाला समर्थन देण्यासंबंधी केलेले विधान हे भाजपा आणि शिवसेना एकत्र येऊ नयेत, यासाठी खेळलेली रणनीती होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गोव्यात केला आहे.मुंबई महापालिका निवडणुकीत जागा वाटपावरून शिवसेना-भाजप यांच्यातील २५ वर्षांची युती तुटल्यानंतर शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल, अशी अटकळ बांधली जात होती. त्यातच ‘पाठिंब्याबाबत प्रस्ताव आला तर विचार करू’ असे विधान शरद पवार यांनी केल्याने राजकीय पतंगबाजीला ऊत आला होता. गोव्यात प्रचाराला आलेले पवार यांनी, गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले तर ते भाजपाच्या विरोधात काम करतील, असे विधान केले. त्यावर महाराष्ट्रात समर्थन आणि गोव्यात विरोध, हे तत्वांशी विसंगत नव्हे काय? असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा किंवा शिवसेनेशी युती केलेली नाही. वस्तुत: हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र होऊ नये, यासाठी रणनीतीचा भाग म्हणून भाजपाच्या समर्थनासंबंधी वक्तव्य आपण केले होते. त्यात या पक्षाशी खरोखरच युती करण्याची तयारीही नव्हती आणि इच्छाही नव्हती, अशी सारवासारवही पवार यांनी केली. गोवा विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसनं आघाडीसाठी प्रतिसाद दिला नाही. निवडणुकीनंतर राष्ट्रवादीची शक्ती त्यांना कळेल, असेही पवार म्हणाले. गोव्यात राष्ट्रवादीकडून ४० पैकी १७ मतदारसंघात उमेदवार उभे करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)