शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

राज्यातील दुष्काळाला शरद पवारच जबाबदार - विखे

By admin | Updated: September 8, 2015 17:19 IST

ज्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि सध्याच्या दुष्काळाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हेच जबाबदार आहेत, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी केली.

विकासाचा खेळखंडोबा केला
 अहमदनगर : राज्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि सध्याच्या दुष्काळाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हेच जबाबदार आहेत, अशी टीका माजी मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी केली आहे. राज्यात पाणीप्रश्नावरुन तेच भांडणे लावण्याचे काम करतात, असा आरोप करुन आता दुष्काळावर मोर्चा काढणार्‍या पवारांनी एवढी वर्षे सत्तेत राहून काय केले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 
सोमवारी लोणी येथे पत्रपरिषदेत विखे बोलत होते. प्रारंभी त्यांनी पवारांचा अप्रत्यक्ष उल्लेख केला. नंतर थेट पवारांवर संधान साधले. विखे म्हणाले, बारामतीकरांमुळे राज्यातील पाणी, वीज प्रश्नासोबत ग्रामीण विकासाचा खेळखंडोबा झाला आहे. पवार ३ वेळा राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रात काही वर्षे कृषी मंत्री होते. राज्यात पाटबंधारे, वीज अशी महत्त्वाची खाती त्यांच्याकडे होती. आज त्यांच्यावर दुष्काळावर मोर्चा काढण्याची वेळ येते, याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे. पवार उठसूट दुसर्‍यांवर शेतीतील काय कळते म्हणून टीका करतात. यांना कळत होते तर यांनी आजवर काय केले, असा सवालही विखेंनी केला. मराठवाड्याचा दुष्काळ कायम राहील, याचे नियोजन पवारांनी खुबीने केले. राज्यात नाशिक, नगर, मराठवाडा ही भांडणे राजकीय पटलावर नेण्याचे श्रेयही त्यांचेच आहे. पश्‍चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे वळविण्याकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. या कामांचे साधे सर्वेक्षणही त्यांनी करू दिले नाही. गोदावरी खोर्‍याचा पाणीप्रश्न पेटत ठेवतात. मात्र बीड, उस्मानाबाद, लातूरचे हक्काचे २१ टीएमसी पाणी कृष्णा खोर्‍यातून देणे बंधनकारक असताना या प्रश्नाला ते बगल देतात. आज राज्यातील ८0 टक्के दुष्काळ एकट्या मराठवाड्यात आहे. 
न्याय देणे कोषातच नाही!
शेतीचे पाणी उद्योगांकडे वळवून शेती ओस पाडण्यास पवारच जबाबदार आहेत. यासाठी त्यांच्याकडून उद्योगांतून कर जास्त मिळतो, शेतीतून कमी मिळतो असे लंगडे सर्मथन केले जाते. न्याय देणे हे त्यांच्या कोषातच नाही. न्याय दिल्याचे ते फक्त भासवतात, अशी टीका विखे यांनी केली. आठमाही कालवे धोरण
■ स्व.शंकरराव चव्हाण यांनी कालवे बारमाहीचे आठमाही करावेत, असे धोरण जाहीर केले कुकडीपासून याची सुरुवात झाली. पवारांनीही यास पाठिंबा दिला. पुढे याचाही त्यांना सोयीस्कर विसर पडला. 
■ केंद्रात कृषी मंत्री असताना कृत्रिम पावसाच्या धोरणास त्यांनी विरोध केला होता. दुष्काळी भागातील जनता सतत आपल्या दारात आली पाहिजे, हेच राजकारण यामागे होते.
■ सध्याच्या राज्य सरकारने कृत्रिम पावसाचे धाडस केले. पवारांनी मोर्चे काढण्यापेक्षा केंद्रातून या प्रयोगासाठी पैसे आणण्यासाठी वजन खर्ची घालावे, असा सल्लाही विखेंनी दिला.
 
कुकडीचे पाणी कुठे गेले?
नगर जिल्ह्याचे कुकडीतील ५0 टक्के पाणी कुठे गेले, असा सवालही त्यांनी केला. कुकडीतून ५0 टक्के पाणी नगर दक्षिण जिल्ह्यासाठी तर ५0 टक्के पुणे जिल्ह्यासाठी होते. यापैकी नगर दक्षिण जिल्ह्याला मिळाले किती, याची चौकशी पवारांनी कधी केली का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
 बारामतीकर बहुरुपीर 
उसाला पाणी कमी पडते, ती तूट भरुन काढण्यासाठी १२ हजार कोटींचा भिमा स्थिरीकरण प्रकल्प त्यांनी हाती घेतला. हेच पैसे वापरुन पश्‍चिमेचे पाणी मराठवाड्याला देण्यास ते हातभार लावू शकले असते. मराठवाड्यासह राज्य तहानलेले ठेवले, आता मात्र त्यांना मराठवाड्यातील दुष्काळ आठवला. त्यामुळे बारामतीकर हे खरे बहुरुपी आहेत, हे सिद्ध होते असे विखे म्हणाले
टगेगिरी हीच संस्कृती 
पवार शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेण्यास विसरत नाहीत. त्यांना ही टगेगिरी अपेक्षित होती, असा त्यांचा समज आहे का? हीच का बारामतीकरांची संस्कृती, अशी कोपरखळीही विखे यांनी मारली.