शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बीटी कापसावर शेंद्री बोंड अळीचे आक्रमण!

By admin | Updated: August 20, 2016 16:36 IST

विदर्भात यावर्षी पिकांना पोषक पाऊस झाल्याने सर्वत्र पिके बहरली आहेत; परंतु किडींना पोषक वातावरण निर्माण झाल्याने बीटी कापसावर गुलाबी बोंड अळीनंतर शेंद्री बोंड अळीने आक्रमण केले आहे

राजरत्न सिरसाट
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २० -  विदर्भात यावर्षी पिकांना पोषक पाऊस झाल्याने सर्वत्र पिके बहरली आहेत; परंतु किडींना पोषक वातावरण निर्माण झाल्याने बीटी कापसावर गुलाबी बोंड अळीनंतर शेंद्री बोंड अळीने आक्रमण केले आहे. सोयबाीनवरही खोडकिडीने हल्ला केल्याने शेतकºयांसमोर हे नवे अस्मानी संकट उभे ठाकले आहे.
 
 विदर्भात पुरक मुरतोनी पाऊस झाल्याने  सर्वच पिके बहरली आहेत; परंतु किडींना पोषक वातावरण तयार झाल्याने पिकांवर वेगवेगळ्या किडींनी हल्ला केला आहे.  खरीप कापसावर तुडतुडे व गुलाबी बोंडअळीने प्रादुर्भाव झाला होता आता शेंद्री बोंडअळीले आक्रमण केले आहे.  सोयाबीनवर हिरव्या उंटअळी, खोंडकींची प्रादुर्भाव वाढला आहे. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पीक संरक्षण अधिकाºयांनी विदर्भात कापसाचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात तज्ज्ञ चमुला  अकोला,बुलडाणा व यवतमाळ या प्रमुख कापूस उत्पादक जिल्हयामध्ये बीटी कापसावर बोंडअळ््यांचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बीटी कापसाचा बेसुमार वापर आणि नॉन बीटीची (रेफ्यूजी बीटी) पेरणी न केल्याने बीटी कापसाला न जुमानणाºया बोंड अळ््यांच्या पिढ्या निर्माण होत आहेत.
बीटी कापसामध्ये बोंडअळीला प्रतिबंधक जीन्स असल्याने शेतकरी बीटी कापूस पेरणीचा पर्यांय निवडतो म्हणून, एकूण कापसाच्या पेरणीपैकी जवळपास ९० टक्के क्षेत्रावर बीटी कापसाची पेरणी शेतकºयांनी केली आहे. पंरतु बोंडअळ््याचा वाढता प्रभाव बघता देशात कापसाचे क्षेत्र यावर्षी कमी झाले आहे.
 
- कशी ओळखावी बोंडअळी?
गुलाबी बोंडअळीचा पतंग लहान व गर्द बदामी रंगाचा असतो.त्याच्या पंखावर बारीक काळे ठिपके असतात. सुरूवातीला अंड्यातून निघणारी ही अळी पांढूरकी असते नंतर ती गुलाबी होते. वाढलेली अळीचा लांबी १८ ते १९ मि.मी.असते. यालाच गुलाबी किंवा शेंदरी बोंडअळी म्हणतात. या बोंडअळीचा प्रादुर्भाव आॅक्टोबरवच्या पहिल्या आठवड्यापासून कापसाच्या हिरव्या बोंडात होतो. पण यावर्षी लकवरच हा प्रादुर्भाव झाला आहे. 
- कापसाचे मोठ्याप्रमाणावर होते नुकसान 
अंड्यातून बाहेर पडलेली अळी कापसाच्या बोंडात शिरल्यांनतर छिद्र बंद होत असल्याने बोंडाचे वरू न निरीक्षण केल्यास या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत नाही.पंरतु हिरवी बोंडे फोडून बघितल्यास प्रादुर्भाव झालेला दिसतो.ही बोंडे परिपक्व न होताच उमलतात. त्यामुळे ्रकपाशीची प्रत बिघडते.बोंडातील अळ््यर सरकी खातात,रू ईची प्रत कमी होते. तेलाचे प्रमाण घटते आणि बियाण्याची उगवणशक्ती कमी होते.
- शेंद्री अळीचा प्रादुर्भाव आढळून आाल्याने शेतकºयांनी शेतकºयांनी पिकांचे नियमित सर्वेक्षण करणे गरजेचे असून, नत्र खताचा बेसुमार वापर टाळावा,कापसाच्या डोमकळ््या शोधून अळीसह नष्ट कराव्यात व कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार फवारणी करावी.
- डॉ.डी.बी.उंदीरवाडे, विभाग प्रमुख, -डॉ. अनिल कोल्हे, मुख्य पीक संरक्षण अधिकारी, किटकशास्त्र विभाग, डॉ.पंदेकृवि,अकोला.