शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

शंभू छत्रपतींचे समाधिस्थळ शासनाच्या दृष्टीने अजूनही दुर्लक्षितच

By admin | Updated: June 27, 2016 22:19 IST

छत्रपती शंभूराजांचे चरित्र ज्याप्रमाने दुर्लक्षित राहिले त्याचप्रमाणे श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील छत्रपती संभाजीमहाराजांचे समाधिस्थळ हे लोकप्रतिनिधी

- सुनील भांडवलकर

कोरेगाव भीमा, दि. २७ - छत्रपती शंभूराजांचे चरित्र ज्याप्रमाने दुर्लक्षित राहिले त्याचप्रमाणे श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील छत्रपती संभाजीमहाराजांचे समाधिस्थळ हे लोकप्रतिनिधी, प्रशासनाच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिले आहे. आजही समाधिस्थळ तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ ह्यकह्ण वर्गामध्ये असून, शासनाने ते ह्यअह्ण किंवा ह्यबह्ण वर्गात समावेश केला, तर पर्यटन विकास महामंडळाच्या निधीतून समाधिस्थळाचा विकास होणे शक्य होईल.संभाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर संभाजीराजांची समाधी राणी सईबाई व शाहू महाराजांनी शोधून काढली. दगडी समाधी बनविण्यात आली. परंतु इंग्रजी राजवटीत पुन्हा समाधी दुर्लक्षित झाली. त्यानंतर इतिहासकार कै. वा. सी. बेंद्रे यांनी समाधी शोधून काढल्यानंतर समाधीचे बांधकाम करण्यात आले. ३ मे १९७६ रोजी महाराष्ट्रातील शंभुभक्तांचे आराध्य दैवत शंभू छत्रपतींचा जगातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमिपूजन शरद पवार यांच्या हस्ते व १७ डिसेंबर १९६७ साली पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते व कामगार व पुनर्वसन मंत्री शंकरराव पाटील, दत्तो वामन पोतदार, प्रा. शिवाजीराव भोसले, बाप्पुसाहेब थिटे, गो. ना. वाघ यांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे बसवण्यात आला.वढू बुद्रुक ग्रामपंचायत, धर्मवीर संभाजीमहाराज स्मृती समिती यांच्या माध्यमातून समाधिस्थळाचा विकास होत आहे. त्यातच आता आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या आमदार ह्यआदर्शग्रामह्णमध्ये सहभागी झाल्याने या स्थळाचा विकास झपाट्याने होण्यास मदत होणार आहे.समाधिस्थळ व बलिदान स्थळास जोडणार पूल गरजेचा...छत्रपती संभाजीमहाराजांच्या समाधिस्थळावर शंभूशिल्पसृष्टी, गार्डन, पार्किंग व्यवस्थेबरोबरच समाधिस्थळ वढू बुद्रुक व बलिदान स्थळ तुळापूर ही दोन्ही ठिकाणे शंभूराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली असल्याने वढू-तुळापूर यांना जोडणाऱ्या पुलाची मागणी शंभूभक्त व वारकऱ्यांची आहे. या पुलाबाबत तत्कालीन विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनीही हिरवा कंदील दाखविला होता. शिवरायांप्रमाणे अद्वितीय स्मारक उभारणार...शिवरायांचे राष्ट्रीय स्मारक अरबी समुद्रात उभे राहणार आहे. त्याच धर्तीवर छत्रपती संभाजीमहाराजांचे राष्ट्रीय स्मारक वढू तुळापूरमध्ये उभारण्याचा संकल्प करतानाच यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तो आराखडा शासनास सादर करण्यात येऊन संभाजीराजांचे अद्वितीय स्मारक उभारणार असल्याचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी सांगितले.समाधिस्थळाची सुरक्षा रामभरोसे...छत्रपती संभाजीमहाराज समाधिस्थळावर सीसीटीव्ही यंत्रणा व कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नाही. त्यामुळे येथील सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. समाधिस्थळावर सुरक्षारक्षक किंवा पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्याची अनेक वर्षांची मागणी आहे. या ठिकाणी खासगी कारखान्यांमार्फत सुरक्षारक्षक ठेवण्याची तयारी दर्शवली होती. परंतु त्यावर अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नाही. पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी औद्योगिक कारखान्यांची पुन्हा बैठक घेऊन याठिकाणी सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही बसवण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.