शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

खेर्डा स्थानकावर ‘शकुंतला’चे इंजिन निसटले!

By admin | Updated: May 14, 2017 02:23 IST

डबे थांबल्याने प्रवासी सुखरूप; नादुरूस्तीचा प्रकार वाढला.

कारंजा लाड : ग्रामीण भागातील प्रवाशांची सोय व्हावी, या मूळ उद्देशाने ब्रिटिश राजवटीत सुरू झालेली शकुंतला रेल्वे आजमितीस जुनी जीर्ण झाली असून, तिला नादुरूस्तीचे ग्रहण लागले आहे. १३ मे रोजी याचा पुन्हा एकवेळ प्रत्यय आला. खेर्डा (ता. कारंजा) येथील स्थानकावरून पुढे निघलेल्या या रेल्वेचे इंजिन अचानक जोड उखडल्याने डबे सोडून धावायला लागले. यावेळी सुदैवाने डबे जागीच थांबल्यामुळे कुठलाही अनर्थ घडला नाही. पूर्वी यवतमाळ ते मूर्तिजापूर या मार्गावर प्रवासाची साधने उपलब्ध नव्हती. ही बाब लक्षात घेऊन ब्रिटिशांनी रेल्वे रूळ टाकून शकुंतलेची सुरूवात केली. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र या रेल्वेच्या देखभाल-दुरूस्तीकडे भारत सरकारचे दुर्लक्ष झाले. तेव्हापासून आजतागायत शकुंतला एकप्रकारे वनवास भोगत आहे. या रेल्वेच्या, रेल्वे रूळाच्या आधुनिकीकरणासाठी एकाही लोकप्रतिनिधीकडून ठोस असा पाठपुरावा अद्याप झालेला नाही. त्यामुळे शकुंतलेचे अस्तित्व संपण्याच्या वाटेवर आहे. १३ मे रोजी सकाळी १0 वाजता ही रेल्वे नित्यनेमाप्रमाणे खेर्डा रेल्वेस्थानकावर पोहोचण्याच्या बेतात असतानाच रेल्वेच्या इंजिनच्या डब्यांसोबतचा जोड अचानकपणे निसटला. त्यामुळे काही अंतरापर्यंत फक्त रेल्वेचे इंजिनच धावले. ही बाब खेर्डा रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करून घडलेला प्रकार रेल्वेचालकाच्या लक्षात आणून दिल्याने मोठा अनर्थ टळला. काही क्षणानंतर रेल्वेचे डबे थांबल्यामुळे आतमध्ये बसलेल्या प्रवाशांनीदेखील सुटकेचा नि:श्‍वास सोडला. त्यानंतर सदर इंजिन पुन्हा डब्यांना जोडून शंकुतला रेल्वे पुढील मार्गक्रमणाकरिता सज्ज झाली. तथापि, अशा गंभीर प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.