शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

शहापाडा, आंबेघर, हेटवणे धरणे ओव्हरफ्लो

By admin | Updated: August 4, 2016 02:25 IST

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात धुवाधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जुलैअखेरपर्यंतच पावसाने सरासरी ओलांडली आहे.

पेण : गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात धुवाधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जुलैअखेरपर्यंतच पावसाने सरासरी ओलांडली आहे. पेणमध्ये यंदा पाऊस जोरदार झाला असून पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पेणमधील शहापाडा, हेटवणे, आंबेघर ही तीनही धरणे ओव्हरफ्लो झाल्याने पेणवासीयांमध्ये समाधान व्यक्त होते. शिवारात भातपिकांची व्यवस्थित लागवड झाली आहे. पावसाने जुलै महिना संपताक्षणीच सरासरी ओलांडली असून आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये होणारा पाऊस १०७ टक्के किंबहुना त्यापेक्षाही जास्त होण्याची दाट शक्यता आहे.हवामान खात्याच्या सर्वेक्षणानुसार १९७० पासून ४६ वर्षात ३४ वेळा जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होता. मात्र गेल्या दहा वर्षाचा विचार केल्यास तर २०१० आणि २०१३ साली जुलै महिन्यात पावसाने सरासरी गाठून ओलांडली होती. गेली दोन वर्षे पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला. मात्र यंदा देशभरात पाऊस चांगला होणार हे हवामान शास्त्र विभागाने जाहीर केले होते. त्यानुसार जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने नदी, नाले, ओढे, तलाव व धरणे तुडुंब भरून वाहू लागली. रायगडात तर पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. दक्षिण रायगडात तर पावसाने हाहाकार माजवला आहे. सह्याद्री पर्वतरांगातील उगम पावणाऱ्या सर्वच नद्यांनी रौद्र रुप धारण केले आहे. पाऊस थांबण्याची चिन्हे न दिसता तो अधिकच वाढत आहे. गतवर्षी प्रतीक्षा करायला लावणारा पाऊस यावर्षी मात्र धुवाधार पडत आहे. पेणच्या भोगावती, पाताळगंगा, बाळगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढत होतच आहे. मात्र समुद्राला उधाण भरती असल्याने ओहोटीच्या वेळेत वेगवान प्रवाही पाण्यामुळे पावसाचे पाणी खाड्यातून वेगाने समुद्राला जावून मिळते. पेण परिसरात यावर्षीचा जुलै महिन्यात जोरदार पाऊस पडून देखील खारेपाटातील भातशेती पाण्याखाली गेली आहे. मात्र जोरदार पावसाचा इतरत्र कुठेही परिणाम जाणवला नाही. जाणवला तो महामार्ग आणि ग्रामीण रस्त्यांची झालेली चाळण ही बाब वगळता एकंदर परिस्थिती सामान्य आहे. मात्र तीनही धरणे ओव्हरफ्लो झाल्याने धरणांच्या विसर्ग होणारा, पाणीसाठा आॅगस्टमध्ये पडणारा पाऊस असाच राहिला तर धोकादायक ठरू शकतो. भातशेतीमध्ये पाणी साचल्याने रोपे कुजण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)