मुंबई : शेजारी राहणा-या ७ वर्षीय चिमुरडीवर तब्बल महिनाभर लैंगिक अत्याचार आणि बलात्कार करून पसार झालेल्या ४२ वर्षीय आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले. अनिल ओवाठ (४२) असे आरोपीचे नाव असून, गुजरातमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असलेला या आरोपीला बोरीवली स्थानक परिसरातून अटक करण्यात आले आहे. वाकोला परिसरात राहणारा नराधम ओवाठ हा येथील केबल आॅपरेटरकडे नोकरी करीत होता. त्याच्या शेजारी राहणाऱ्या ७ वर्षांच्या चिमुरडीवर त्याची वाईट नजर पडली. आई-वडील नोकरीनिमित्त दिवसभर घराबाहेर जात असल्याने हीच संधी साधून गेला महिनाभर तो चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करीत होता. अशाप्रकारे २७ तारखेला चिमुरडीला घरात बोलावून ओवाठने तिच्यावर बलात्कार करून पळ काढला. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी ओवाठविरोधात गुन्हे दाखल करून त्याचा शोध सुरू केला. अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा कक्ष ८ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी सुरू केला. ओवाठ हा गुजरातला पळून जाण्याच्या तयारीत असून, तो बोरीवली स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती फटांगरे यांच्या तपास पथकाला मिळाली. त्यानुसार शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. (प्रतिनिधी)
चिमुरडीवर लैंगिक अत्याचार
By admin | Updated: March 30, 2015 04:16 IST