शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींचे लैैंगिक शोषण; आश्रमशाळेची मान्यताच रद्द

By admin | Updated: November 5, 2016 06:24 IST

आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी चवथ्या इयत्तेतील विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण गुरुवारी उघडकीस

खामगाव (बुलडाणा) : आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी चवथ्या इयत्तेतील विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण गुरुवारी उघडकीस आल्यानंतर, राज्य शासनाने शुक्रवारी तालुक्यातील पाळा येथील स्व. निंबाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेची मान्यता रद्द केली. तर, आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी दुपारी शाळेला भेट दिल्यानंतर येथील सर्व कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचीही घोषणा केली.या शाळेतील आणखी काही अल्पवयीन विद्यार्थिनी वासनांध कर्मचाऱ्यांच्या अत्याचारास बळी पडल्या असण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर, या गंभीर प्रकरणाच्या तपासासाठी नागपूर येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षक आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. स्व. निंबाजी कोकरे आदिवासी आश्रमशाळेत इयत्ता चवथीमध्ये शिकत असलेल्या, जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथील एका विद्यार्थिनीने, दिवाळीच्या सुटीत गावी गेल्यानंतर, शाळेत विद्यार्थिनींचे लंैगिक शोषण होत असल्याची तक्रार वडिलांकडे केली. हादरलेल्या वडिलांनी गुरुवारी हिवरखेड पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर, पोलिसांनी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह एकूण १३ जणांविरुद्ध भारतीय दंड विधानाचे कलम ३७६, तसेच बाल लैंगिक अत्याचार अधिनियम (पॉस्को) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक (अ‍ॅट्रॉसिटी) कायद्यान्वये गुन्हे दाखल केले. या गंभीर प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली असून, विरोधकांनी सरकारला धारेवर धरणे सुरू केले आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी पाळा येथे आश्रमशाळेस भेट दिल्यानंतर आरोग्य मंत्री व आदिवासी विकास मंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. दुसरीकडे गत काही दिवसांपासून सातत्याने विरोधकांचे लक्ष्य ठरलेले आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनीही शुक्रवारी दुपारी जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर आणि भाजपा नेते एकनाथ खडसे यांच्यासह आश्रमशाळेस भेट दिली; मात्र त्यांना तेथे आदिवासी बांधवांच्या रोषास सामोरे जावे लागले. पाळा येथे पोहोचण्यापूर्वीच युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखविले, तर थोडे पुढे जाताच आदिवासी बांधवांनी त्यांचा ताफा अडवला. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आदिवासी बांधवांनी सावरा यांच्याकडे केली. आश्रमशाळेच्या भेटीदरम्यानही संतप्त नागरिकांनी सावरा व भाजपा सरकारच्या विरोधात नारेबाजी केली. आश्रमशाळेस भेट देऊन परतल्यानंतर खामगाव येथे पत्रकार परिषदेस संबोधित करताना, सावरा यांनी स्व. निंबाजी कोकरे आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्याची, कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची, तसेच ३० दिवसांत आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याची घोषणा केली. या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले. (प्रतिनिधी)>आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी या घटनेबाबत असंवेदनशील विधान केलेले आहे. त्यांचे खाते आदिवासींचे प्रश्न सोडविण्यात पुरते अपयशी ठरलेले असताना मुख्यमंत्री त्यांचा किती दिवस आणि का बचाव करीत आहेत? सावरांची तातडीने हकालपट्टी करा.- राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते११ आरोपींना पोलीस कोठडीया प्रकरणातील एकूण १३ आरोपींपैकी ११ आरोपींना शुक्रवारी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने येत्या गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, तर उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे.आदिवासी आश्रमशाळेतील अत्याचार पीडित विद्यार्थिनीला राज्य शासनाच्या मनोधैर्य योजनेतून आर्थिक मदत देण्यात येईल. या घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्यासाठी शासन सर्व उपाययोजना करेल. - पंकजा मुंडे, महिला व बालकल्याण मंत्री>महिला अधिकारी करणार तपासणीशासकीय वा अनुदानित आश्रमशाळांमध्ये महिला अधिकारी जातील आणि मुलींच्या तक्रारी जाणून घेतील. तसेच असुविधांची नोंद घेऊन त्या सरकारला सांगतील आणि त्यावर उपाययोजना करण्यात येतील. - देवेंद्र फडणवीस