शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

मुंबईतील सांडपाण्याची व्यवस्था

By admin | Updated: June 23, 2016 10:28 IST

मराठी विज्ञान परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी व्याख्यानमालेत मुंबईतील सांडपाण्याची व्यवस्था विषयावर मुंबई महानगरपालिकेचे सांडपाणी विभागाचे निवृत्त मुख्य अभियन्ता श्री.सु.ना.पाटणकर यांचे व्याख्यान झाले

  मराठी विज्ञान परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी व्याख्यानमालेत मुंबईतील सांडपाण्याची व्यवस्था विषयावर मुंबई महानगरपालिकेचे सांडपाणी विभागाचे निवृत्त मुख्य अभियन्ता श्री.सु.ना.पाटणकर यांचे व्याख्यान झाले त्याचा हा गोषवारा...

 
   मनुष्य जे पाणी वापरतो त्याचे वापरानंतर सांडपाण्यात रुपांतर होते.मुंबईतील सर्व प्रकारच्या वापरासाठीचे पाणी हे पिण्याच्या दर्जाचे असते.मात्र जेव्हा त्याचे सांडपाण्यात रुपांतर होते,तेव्हा ते  सांडपाणी मात्र एकाच दर्जाचे असत नाही. उदाहरणार्थ संडासातून बाहेर पडणा-या पाण्याला काळे पाणी (ब्लॅक वोटर ) म्हणतात, तर स्वयंपाक घराच्या सिंकमधून येणारे आणि आंघोळीनंतरच्या पाण्याला करडे पाणी (ग्रे वोटर) म्हणतात. तर लघवी झाल्यानंतर त्यावर टाकलेल्या पाण्याला पिवळे पाणी (यलो वोटर) म्हणतात.यातले काळे पाणी हे सर्वात घातक पाणी होय. मुंबईतील जमा होणारे ९० टक्के सांडपाणी वाहून नेले जाते आणि १० टक्के उरलेले सांडपाणी सेप्टिक टेंकमध्ये पाठवले जाते व ते नियमितपणे तेथून काढून घेतले जाते. पूर्वी आपल्याकडे फ्लशचे संडास नव्हतेच.पण ही फ्लशची पध्दत आपण पाश्चात्य देशाकडून उचलली.खरे म्हणजे पाणी फुकटात उपलब्ध होत असल्याने मैला आणि इतर घाण गोष्टी वाहून नेण्याचे हमाली काम करण्यासाठी आपण पाण्याचा उपयोग करीत असतो,पण जसजशी लोकसंख्या वाढत जाईल तसतसे आपल्याला या हमाली कामातून पाण्याला वाचवायला हवे.विमानातील संडासात मैला वाहून नेण्यासाठी पाणी वापरत नाहीत.तेथे पोकळी (व्हेक्यूम) निर्माण करून मैला ओढून घेतात.ही पध्दत आता नेदरलंड,स्वीडन आणि जर्मनी येथे गावागावात सुरु झाली असून त्याला ते इकौवन (Ecowan) असे म्हणतात.मुंबईजवळील बदलापूरच्या आदर्श विद्यालयात इकौवन योजना वापरायला सुरुवात झाली आहे.या  योजनेतून खतही मिळते. 
           मुंबईच्या आजूबाजूचे  २५ किलोमीटरचे क्षेत्रफळ हे एमएमआर (मुंबई मेट्रोपोलीटन रिजनमध्ये येते.या एवढ्या हद्दीत १५ नद्या असल्याने मुंबईत पाण्याचा सुकाळ आहे.या क्षेत्रात सात धरणे आहेत.मुंबईत पहिली सांडपाण्याची पाईप लाईन १८८० साली कुलाब्याला टाकली गेली.आणि १९३५ साली दादरचे उदंचन केंद्र सुरु झाले.१९८५ साली मुंबई सांडपाणी निचरा प्रकल्प आखला गेला.
            सांडपाण्यात ९९.९ टकके पाणी असते.उरलेल्या ०.१ टक्क्यात सेंद्रीय,असेन्द्रीय,तरंगणारे पदार्थ,गाळ,वाळू,विद्राव्य,अविद्राव्य असे पदार्थ असतात.सांडपाण्यात कोणते पदार्थ असणार हे ते कोठून येते यावर अवलंबून असते.उदा.घरात सुध्दा संडास,न्हाणीघर,स्वयंपाकघर इत्यादी जसे भाग येतात तसेच,ते पाणी कारखान्यातून येते का,मग कोणत्या कारखान्यातून येते,ते सांडपाणी रुग्णालयातून येते की शेतातून यावर त्याची प्रत अवलंबून असते.मुंबईतील घराघरातून येणारे सांडपाणी जमिनीखालील पाइपलाईनीतून मेनहोलमध्ये जमा होते.अशा  ड्रेनेज मेनहोलची  मुंबईतील संख्या ५७००० आहे.मुंबईत कुलाबा,वरळी,बांद्रा,वरसोवा,मालाड,घाटकोपर आणि भांडूप येथे उदंचन केंद्रे आहेत.सांडपाणी सकाळी ६ ते १० आणि संध्याकाळी ६ ते रात्री १० या काळात अधिक जमा होते.सांडपाण्याचा पाईपातून वाहणा-या सांडपाण्याचा वेग दर सेकंदाला १ मीटर असा असतो व ते उताराच्या दिशेने जाते.बोरीबंदरपासून वरळीपर्यंत ते यायला सहा तास लागतात.यासाठी बांधलेल्या  मार्गाला (बोगदाच म्हणा की) ओव्हिड म्हणतात.त्याचा आकार २ मीटर रुंद आणि ३ मीटर उंच असा असतो.जागोजागी दिलेल्या उतारामुळे शेवटी बोरीबदरचे पाणी वरळीला येते तव्हा ते १०-११ मीटर खोल असते आणि तेथून ते पंपाने उचलुन जमिनीवर आणावे लागते.सांडपाण्यातील तरंगणारे आणि अविद्राव्य घनपदार्थ गाळून बाजूला करावे लागतात.व वरचे पाणी शुध्दिकरणासाठी न्यावे लागते.मग त्यात हवेतील ऑक्सिजन (एरिएशन) मिसळतात.गेली शंभर वर्षे याच पध्दतीने पाण्याचे शुद्धीकरण केले जात आहे.नंतर हे काहीसे शुद्ध केलेले पाणी वरळीहून ३.५ मीटर व्यासाच्या ५० मीटर समुद्र पातळीच्या खालून समुद्रात ३ किलोमीटर आत नेऊन समुद्रात सोडले जाते.तीन किलोमीटरच का तर त्या ठिकाणाहून घन पदार्थ परत वाहत वाहत किना-यापर्यंत येत नाहीत हे निरीक्षण आहे.असे असले तरी ६० टक्के झोपडपटटयांचे पाणी सांडपाण्याच्या पाईपलाइनीना जोडलेले नाही.मुंबईच्या जवळ ठाणे,मालाड,अरबी समुद्र,व मुंबई हार्बर या खाड्या असल्याने मुंबईत सांडपाण्याचा निचरा होतो आणि त्याचा उपसर्ग जनतेला होत नाही.मुंबईल्या २९११ दशलक्ष लिटर पाणी पुरवठ्यातील सांडपाणी या स्वरूपात २००० दशलक्ष लिटर पाणी बाहेर येते.महाराष्ट्रात एकूण ११००० दशलक्ष लिटर सांडपाणी तयार होते.अमेरिकेत ३० ते ४० टक्के सांडपाणी शुध्द करून परत वापरले जाते. 
         मुंबईचे क्षेत्रफळ ४३९ चौरस किलोमीटर असून १.२ कोटी लोकसंख्या आहे.सध्या पाण्याची मागणी ३९७५ दशलक्ष लिटरची असून पुरवठा मात्र ३०२५ दशलक्ष लिटरचा आहे.२०२५ साली हीच मागणी ५१०० दशलक्ष लिटरची असणार आहे.मुंबईच्या पाण्याचा पुरवठा मुख्यता: तानसा,मोडकसागर,ऊर्ध्व वैतरणा आणि भातसा येथून होतो.हे पाणी आपल्याला पुरवण्यापूर्वी भांडूप आणि पिसे-पांजरापोळ येथे शुध्द केले जाते.घरगुती वापरासाठी दीड रुपया ते ३.५० रुपये प्रती हजार लिटर हा दर लावला जातो तर औद्योगिक वापरासाठी ८ रुपये ते ३५ रुपये प्रती हजार लिटर हा दर लावला जातो.तर पाणी उत्पादनाचा खर्च ५ रुपये प्रती हजार लिटर असा पडतो.मुंबईत ३ लाख साठ हजार पाण्याचे मीटर लावले असून त्याद्वारे सगळ्यांना पाणी पुरवले जाते.पाणी जेव्हा मोठ्या प्रमाणात पुरवले जाते तेव्हाच ही मीटर्स काम करतात म्हणून ती सोसायटयाना लावली जातात आणि विजेच्या मीटरसारखी प्रती कुटुंब देता येत नाहीत.
 
अ.पां.देशपांडे,
कार्यवाह,मराठी विज्ञान परिषद