शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

सातवा वेतन आयोग देता, मग हमीभाव का नाही?

By admin | Updated: March 7, 2016 03:46 IST

सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देता, त्याबद्दल दु:ख नाही. परंतु अडचणीतील शेतकऱ्यांच्या मालाला सरकार हमीभाव का देत नाही, असा सवाल अभिनेते नाना पाटेकर यांनी येथे उपस्थित केला.

कोल्हापूर : सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देता, त्याबद्दल दु:ख नाही. परंतु अडचणीतील शेतकऱ्यांच्या मालाला सरकार हमीभाव का देत नाही, असा सवाल अभिनेते नाना पाटेकर यांनी येथे उपस्थित केला.येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह व शाहू खासबाग कुस्ती मैदानाचे उद्घाटन पाटेकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात ते म्हणाले, सर्वच पक्षांतील राजकारण्यांनी विश्वासार्हता गमावल्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कार्यरत असलेल्या नाम फाउंडेशनला सामान्य माणूसही आर्थिक मदत करत आहे. नाना यांनी आपल्या ‘खास शैली’त राजकारण्यांचा समाचार घेत त्यांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले. कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी होते. पेन, पाण्याची बाटली अशा सर्वच वस्तूंचे दर ठरलेले आहेत; पण शेतकऱ्यांच्या मालाचा भाव निश्चित नाही. परिणामी, तो आर्थिक अडचणीत येत आहे. आपल्या आई-वडिलांच्या आजारपणातील औषधोपचाराचा खर्च तो करू शकत नाही. मुलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात त्याला अपयश येते. त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करीत आहे. आई, वडील, दोन लेकरांना मागे सोडून तो गळफास घेतो. बळीराजाला एकाकी वाटत आहे. तो निराश झाला आहे, असे नाना म्हणाले.अनेक संघर्ष करत मी येथे पोहोचलो आहे. अनेकवेळा फूटपाथवर झोपलोही. १०-१५ रुपयांत दिवस काढले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता अडचणींना सामोरे जावे. आत्महत्या करणे हे षंडपणाचे लक्षण आहे. म्हणून अडचणीतील शेतकऱ्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे काम नाम फाउंडेशन करीत आहे. शरद पवार माझे जवळचे मित्र आहेत. बाळासाहेब ठाकरे वडिलांच्या स्थानी आहेत. मात्र, मी कधी हात पसरला नाही. हात पसरले की किमतीचे लेबल लागते अन् मैत्री संपते, असे त्यांनी सांगितले.सरकार कोणाचेही असो, पहाट आमची होवो, अशी जनतेची अपेक्षा असते. त्यामुळे निवडणुकाझाल्यानंतर सर्व पक्षांच्या नेत्यांची ‘तोंडे’ एकाच बाजूला असावीत. अन्यथा आमचे वाटोळे होते, असा टोला त्यांनी लगावताच हशा पिकला. (प्रतिनिधी)