शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

माळशेजमध्ये आढळले सातवाहनकालीन चौक्या

By admin | Updated: January 13, 2015 04:49 IST

मुरबाडमध्ये माळशेज घाटात डोंगर पायथ्याशी सातवाहनकालीन रखवालदारांच्या चौक्या सापडल्या आहेत. घाटातील छत्री पॉइंट परिसरात सातवाहनकालीन शिलालेख सापडण्याची शक्यता इतिहास संशोधक व्यक्त करत आहेत.

राजेश भांगे, शिरोशीमुरबाडमध्ये माळशेज घाटात डोंगर पायथ्याशी सातवाहनकालीन रखवालदारांच्या चौक्या सापडल्या आहेत. घाटातील छत्री पॉइंट परिसरात सातवाहनकालीन शिलालेख सापडण्याची शक्यता इतिहास संशोधक व्यक्त करत आहेत. त्यामुळे माळशेज घाट ऐतिहासिक पर्यटनस्थळ बनण्याची चिन्हे आहेत.छत्री पॉइंटच्या पुढे एका वळणावर पायवाट असून तिच्या बाजूला दोन चौक्या आहेत. त्यांची उंची पाच फूट; तर लांबी आठ फूट आहे. तालुक्यातील काही इतिहास संशोधक मंडळांचे सदस्य अविनाश हरड, योगेंद्र बांगर, हरेंद्र सोष्टे, प्रणिती हरड यांनी या चौक्यांवर प्रकाश टाकला आहे. या दोन्ही चौक्या माळशेज महामार्गावरून स्पष्टपणे दिसतात. चौक्यांच्या बाजूला दोन मोठी तळी आहेत. तळ्यांमध्ये हिरवेगार पाणी आहे. पूर्वीच्या काळात देशविदेशांतून कल्याण बंदरामध्ये माल आल्यानंतर तो माळशेज घाट व नाणेघाटात आणला जायचा़ त्यासोबत असणाऱ्या व्यक्तीच्या संरक्षणासाठी रखवालदारांच्या या चौक्या बनवल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या चौक्या उंचावर असल्याने दरीच्या बाजूला असणारी लहान गावे सावर्णे व थीधबी ही स्पष्टपणे दिसतात. या गावांवर नीट लक्ष देता यावे, यासाठी चौक्या उंचावर असाव्यात, असा अंदाज आहे.