शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

खूनप्रकरणी सात वर्षांची सक्तमजुरी

By admin | Updated: October 13, 2014 13:20 IST

क्षिण सोलापूर तालुक्यातील पिंजारवाडी येथे मुलावर होत असलेल्या खुनीहल्ल्यात मध्ये आल्याने वडिलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी हाजीमलंग महताब नदाफला वर्षांची सक्तमजुरी व १0 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.

 सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील पिंजारवाडी येथे मुलावर होत असलेल्या खुनीहल्ल्यात मध्ये आल्याने जखमी होऊन वडिलाचा मृत्यू झाल्याप्रकरणी हाजीमलंग महताब नदाफ (वय ३५) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश अश्‍विनकुमार देवरे यांनी ७ वर्षांची सक्तमजुरी व १0 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. तर दोघांना आरोपातून मुक्त केले. महिबूब हुसेनबाशा पटेल (वय ३0), हाजीमलंग महताब नदाफ (वय ३५), महताब अन्सार नदाफ (वय ५५, सर्व रा. पिंजारवाडी, ता. दक्षिण सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत.खटल्याची पार्श्‍वभूमी अशी, महिबूब पटेल यांनी लाडलेमशाक शेख यांच्याकडे त्यांच्या मुलीसोबत लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र लाडलेमशाक शेख यांनी हा प्रस्ताव नाकारून, त्यांनी आपल्या मुलीचा विवाह दुसरीकडे लावून दिला. त्यानंतर त्यांच्याच जमिनीवर वीटभट्टी सुरू करण्यास हरकत घेतली. यामध्ये फिर्यादी सैपन इस्माईल पटेल (वय २८, रा. पिंजारवाडी, ता. दक्षिण सोलापूर) यांचाही हात असल्याचा समज करून घेतला. दि.११ ऑगस्ट २0१३ रोजी हाजीमलंग नदाफ, महताब नदाफ यांनी सैपन शेख यांचे सासरे लाडलेमशाक शेख यांच्या घरी गेले. त्यावेळी तेथील शाहीन शेख हिला दमदाटी केली. ती घाबरून सैपन शेख यांच्या घरी पळत गेली असता महिबूब पटेल व महताब नदाफ यांनी तिचा पाठलाग केला. त्यावेळी सैपन शेख यांच्या घरी त्यांचे वडील उपस्थित होते. दोघांनी सैपन शेख यांना मारहाण करण्यास सुरूवात केली, त्यात हाजीमलंग नदाफ याच्या हातामध्ये गुप्ती होती तर महिबूब पटेल व महताब नदाफ हे दोघे चिथावणी देत होते. त्यावेळी हाजीमलंग नदाफ याने हातातील गुप्तीने सैपन शेख याच्यावर वार करण्यासाठी गेला असता त्यांचे वडील इस्माईल शेख मध्ये आले. त्यामुळे गुप्ती त्यांच्या छातीत बसली आणि ते गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावले. या मृत्यूस हाजीमलंग हा एकटाच जबाबदार असल्याने त्याला सदोष मनुष्यवधाखाली दोषी धरून शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकारतर्फे अँड. आनंद कुडरूकर, मूळ फिर्यादीतर्फे अँड. धनंजय माने तर आरोपीतर्फे अँड. डी.ए.मुल्ला यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)