शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

हल्ल्याप्रकरणी सात वर्षांची शिक्षा

By admin | Updated: April 30, 2016 00:35 IST

प्राणघातक हल्ला करणाऱ्याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांनी सात वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजारांचा दंड सुनावला

पुणे : किरकोळ वादावादीमधून चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांनी सात वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजारांचा दंड सुनावला, तर न्यायालयाने पुराव्याअभावी तीन जणांची निर्दोष मुक्तता केली. ही घटना २१ डिसेंबर २००६ रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली होती. डब्ल्यू. बलदेव दास (वय ३२, रा. हडपसर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेमध्ये अनिल रामानंद दास (वय ३५, रा. पिंपरी) जखमी झाले होते, तर सहायक पोलीस फौजदार एच. एम. कांबळे यांनी फिर्याद दिली होती. आरोपी, जखमी तसेच फिर्यादी बिहारमधील भागलपूर येथील रहिवासी आहेत. समोसे बनविण्याचे काम करणारे सर्व जण २१ डिसेंबर २००६ रोजी रात्री ११.४५च्या सुमारास बिबवेवाडी कोंढवा रस्त्यावर दारूपीत बसले होते. गावाकडील चर्चा निघाल्यावर त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला. चिडलेल्या आरोपींनी दास याच्यावर सुरीने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने डब्ल्यू. बलदेव याला शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. रणजित मोरे यांनी ६ साक्षीदार तपासले. (प्रतिनिधी)