शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

विदर्भ, मराठवाड्यात उष्माघाताचे सात बळी

By admin | Updated: May 25, 2015 03:31 IST

उष्णतेच्या असह्य लाटेने होरपळत असलेल्या विदर्भ आणि मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांत उष्माघाताने आणखी सात जणांचा बळी घेतल्याचे वृत्त आहे

मुंबई : उष्णतेच्या असह्य लाटेने होरपळत असलेल्या विदर्भ आणि मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांत उष्माघाताने आणखी सात जणांचा बळी घेतल्याचे वृत्त आहे. यामुळे गेल्या आठवडाभरात विदर्भात उष्माघाताने दगावलेल्यांची संख्या ११ वर पोहोचली आहे.नागपूर येथून आलेल्या वृत्तानुसार उन्हाच्या तडाख्यामुळे गेल्या दोन दिवसांत उपराजधानीत पाच जणांचा मृत्यू झाला. त्यात एका खेळाडूचाही समावेश आहे. पोलिसांनी या सर्व मृत्यूंची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली असली तरी वैद्यकीय लक्षणांवरून हे सर्वजण उष्माघातानेच दगावल्याचे मानले जात आहे. याआधी गुरुवार, शुक्रवार व शनिवारी विदर्भात पाचजण उष्माघाताने सहाजण मृत्यूमुखी पडले होते.नागपूरमधील बळींपैकी फक्त राजेश वर्मा या ३२ वर्षीय व्यक्तीचीओळख पटली. याखेरीज गणेशपेठ परिसरात ४५ ते ५० वयोगटातील येका महिलेचा व राणी झाशी चौकात सुमारे ४० वर्षाच्या पुरुषाचा व लकडगंजमध्ये एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. दिक्षितनगर मैदानावर क्रिकेटचा सराव करीत असताना अचानक चक्कर येऊन आदित्यसिंग सयाजीसिंग या २४ वर्षीय खेळाडूचा मृत्यू झाला.वाशिमहून मिळालेल्या वृत्तानुसार मंगळूरपीर येथे अनिल राजाराम चव्हाण या पोलीस शिपायाचा उष्माघाताने मृत्यू झाला. मनोरा चौकातील पालिका शाळेजवळ चक्कर येऊन चव्हाण यांच्या डोक्याला जबर मार लागला. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्याच्या बसमत तालुक्यात कौठा येथे विठ्ठलराव कल्याणकर (६५) वृद्धाचा असह्य उष्म्याने बळी घेतला. त्यांना ताप भरला व झटके येण्यास सुरुवात झाली. उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)