शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

हज यात्रेसाठी सात हजार जागा

By admin | Updated: March 25, 2016 02:33 IST

मुस्लीम धर्मामध्ये अत्यंत पवित्र व महत्त्वपूर्ण मानल्या जात असलेल्या सौदी अरेबियातील हज यात्रेसाठी यंदा केंद्रीय हज कमिटी आॅफ इंडियाने राज्य व केंद्रशासित प्रदेशनिहाय यात्रेकरूंच्या जागा

- जमीर काझी,  मुंबई

मुस्लीम धर्मामध्ये अत्यंत पवित्र व महत्त्वपूर्ण मानल्या जात असलेल्या सौदी अरेबियातील हज यात्रेसाठी यंदा केंद्रीय हज कमिटी आॅफ इंडियाने राज्य व केंद्रशासित प्रदेशनिहाय यात्रेकरूंच्या जागा (कोटा) जाहीर केल्या आहेत. देशात सर्वाधिक २१,८२५ जागा उत्तर प्रदेशला मिळालेल्या आहेत, तर महाराष्ट्रातून कमिटीच्या मार्फत ७,३५७ भाविकांना हज यात्रेला जाण्याची संधी मिळणार आहे. या वर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यादरम्यान हजचा मुुख्य विधी होणार आहे. त्यासाठी भारतातून कमिटीमार्फत जाण्यासाठी तब्बल ४ लाख ५ हजार १८७ जण इच्छुक असताना समितीच्या वाट्याला ९८ हजार ८२० जागा आल्या आहेत. त्यामुळे सोडतीद्वारे (ड्रॉ) यात्रेकरूंची निवड केली जाणार आहे. या सोडतीचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे हज कमिटी आॅफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अताऊर रहमान यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मुस्लीम धर्मातील पाच प्रमुख तत्त्वांपैकी हज यात्रा ही एक आहे. दरवर्षी मक्का व मदिना येथे होणाऱ्या यात्रेसाठी भारतातील दीड लाखावर मुस्लीम बांधव केंद्रीय हज कमिटी व प्रायव्हेट टूर्समार्फत सहभागी होतात. हज कमिटीने यंदा यात्रेसाठी तीन महिन्यांपूर्वी आॅनलाइन अर्ज मागविले होते. त्यानुसार देशभरातून ४ लाख ५ हजार १८७ जणांनी अर्ज केले आहेत. सौदी सरकारने हज कमिटीसाठी एकूण ९८,८२० तर खासगी प्रवासी कंपन्यांसाठी २५ हजारांवर जागा निश्चित केल्या आहेत. सौदी सरकारकडून कोटा निश्चित झाल्यानंतर हज कमिटी राज्यनिहाय प्रवाशांचा कोटा निश्चित करते. प्रत्येक राज्यातील मुस्लीम लोकसंख्येच्या प्रमाणात त्या राज्यासाठी जागा दिल्या जातात. २०११च्या जनगणनेनुसार ही जागानिश्चिती होते.बिहारमध्ये इच्छुक कमीहज यात्रेसाठी प्रत्येक राज्यातील निर्धारित जागांच्या तुलनेत इच्छुकांची संख्या सरासरी ६-७ पट असताना बिहार मात्र त्यात अपवाद ठरले आहे. या ठिकाणी मुस्लीम लोकसंख्येचे प्रमाण १०.१९ टक्के असल्याने ९,५८९ जागा निश्चित केल्या आहेत. मात्र इच्छुक भाविकांची संख्या त्याहून कमी म्हणजे ७ हजार २५ इतकी आहे. त्यामुळे या राज्याचा शिल्लक कोटा अन्य राज्यात वर्ग केला जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी अताउर रहमान यांनी सांगितले.