शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जब्याला नागराज देतो महिना सात हजार रुपये!

By admin | Updated: May 17, 2016 08:07 IST

संसार चालविण्यासाठी वर्षानुवर्षे हलगीवर टाकावी लागणारी थाप आजही त्यांच्या नशिबी आहे

राजा माने,  

सोलापूर-गावोगावी होणाऱ्या छोट्या-मोठ्या कार्यक्रमात हलगी वाजविणे... संसार चालविण्यासाठी वर्षानुवर्षे हलगीवर टाकावी लागणारी थाप आजही त्यांच्या नशिबी आहे... मोलमजुरी ही देखील आईच्या पाचवीला पूजलेलीच... हे वास्तव चित्र आहे देश-विदेशात गाजलेल्या ‘फॅन्ड्री’चा हीरो जब्या... सोमनाथ लक्ष्मण अवघडे याच्या जीवनाचे !त्यात आनंदाची बाब म्हणजे सोमनाथ आपल्या जीवनाला आकार देण्यासाठी सच्ची धडपड करतोय. इयत्ता दहावी पार करून आता तो कॉलेजला निघण्याच्या तयारीला लागलाय. ‘सैराट’चा यशाचा वारू सैराट सुटलेला असताना त्यावर स्वार झालेला नागराज मंजुळे त्याला दरमहा सात हजार रुपये देऊन मदत करतोय तर त्या जोडीला सोमनाथच्या जीवनातील पालकाची खरी भूमिका वटविणारे करमाळ्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रा.प्रदीप मोहिते व त्यांच्या पत्नी कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.संगीता मोहिते यांनीही त्याचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी चंग बांधला आहे. ‘सैराट’ अनेक विक्रम नोंदवत असताना ‘फॅन्ड्री’चा हीरो आणि त्याचे कुटुंब आज काय करताहेत हे जाणण्याचा ‘लोकमत’ने प्रयत्न केला. नागराजला फॅन्ड्रीचा हीरो जब्या करमाळा तालुक्यातील केम या छोट्याशा गावात हलगी वाजवणारा सोमनाथ लक्ष्मण अवघडे हा शाळकरी मुलगा सापडला. सोमनाथचे वडील लक्ष्मण पोतराज तर आई जयश्री घरकाम व मोलमजुरी करणारी. हातावरचे पोट असलेल्या या कुटुंबातील सोमनाथ फॅन्ड्रीमुळे रात्रीत जब्याच्या रूपाने हीरो झाला अन् देश-विदेशात पोहोचला. पण त्याचे आणि कुटुंबाचे जीवनमान आहे तेथेच राहिले. आता नागराजचा जब्या गाजला. पण अवघडे कुटुंब मात्र केमच्या गावकुसाबाहेरील आपल्या पत्र्याच्या घरात पूर्वी होते तेच जीवन जगत आहेत. वडील लक्ष्मण यांनी पोतराजाचे काम सध्या सोडले आहे आणि ते हलगी वाजवून चार पैसे कमविण्यात गुंतले आहेत तर आई जयश्री घरकाम आणि मोलमजुरी करीत आहे. सोमनाथ शिकावा, त्याचे व्यक्तिमत्त्व आणखी बहरावे व त्याचे कलाक्षेत्रात नाव व्हावे यासाठी नागराज त्याला आर्थिक मदत करतोय आणि हितचिंतक मंडळीही त्याच्यासाठी पडेल ती जबाबदारी उचलायला तयार आहेत.