शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

जब्याला नागराज देतो महिना सात हजार रुपये!

By admin | Updated: May 17, 2016 08:22 IST

कुटुंबाला हातभार लावण्यासाठी गावोगावी छोट्या-मोठय़ा कार्यक्रमात हलगी वाजविणे आजही त्यांच्या नशिबी आहे.. मोलमजुरी ही देखील आईच्या पाचवीला पूजलेलीच.

 राजा माने

सोलापूर, दि. १७ - कुटुंबाला हातभार लावण्यासाठी गावोगावी होणार्‍या छोट्या-मोठय़ा कार्यक्रमात हलगी वाजविणे आजही त्यांच्या नशिबी आहे.. मोलमजुरी ही देखील आईच्या पाचवीला पूजलेलीच..हे वास्तव चित्र आहे देश-विदेशात गाजलेल्या 'फॅन्ड्री'चा हीरो जब्या.. सोमनाथ लक्ष्मण अवघडे याच्या जीवनाचे !
 
त्यात आनंदाची बाब म्हणजे सोमनाथ आपल्या जीवनाला आकार देण्यासाठी सच्ची धडपड करतोय. इयत्ता दहावी पार करून आता तो कॉलेजला निघण्याच्या तयारीला लागलाय. 
 
'सैराट'चा यशाचा वारू सुसाट असताना त्यावर स्वार झालेला नागराज मंजुळे त्याला दरमहा सात हजार रुपये देऊन मदत करतोय. याशिवाय सोमनाथच्या जीवनातील पालकाची खरी भूमिका वटविणारे करमाळ्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्रा. प्रदीप मोहिते व त्यांच्या पत्नी कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. संगीता मोहिते यांनीही त्याचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी चंग बांधला आहे. 
 
'सैराट' अनेक विक्रम नोंदवत असताना 'फॅन्ड्री'चा हीरो आणि त्याचे कुटुंब आज काय करताहेत हे जाणण्याचा 'लोकमत'ने प्रयत्न केला. नागराजला फॅन्ड्रीचा हीरो जब्या करमाळा तालुक्यातील केम या छोट्याशा गावात हलगी वाजवणारा सोमनाथ लक्ष्मण अवघडे हा शाळकरी मुलगा सापडला. सोमनाथचे वडील लक्ष्मण पोतराज तर आई जयश्री घरकाम व मोलमजुरी करणारी. हातावरचे पोट असलेल्या या कुटुंबातील सोमनाथ फॅन्ड्रीमुळे रात्रीत जब्याच्या रूपाने हीरो झाला अन् देश-विदेशात पोहोचला.
 
पण त्याचे आणि कुटुंबाचे जीवनमान आहे तेथेच आहे. अवघडे कुटुंब आजही केमच्या गावकुसाबाहेरील पत्र्याच्या घरात राहतात. वडील लक्ष्मण यांनी पोतराजाचे काम सोडले असून ते हलगी वाजवून चार पैसे कमवतात. आई जयश्री घरकाम करते. सोमनाथ शिकावा, त्याचे व्यक्तिमत्त्व आणखी बहरावे व त्याचे कलाक्षेत्रात नाव व्हावे यासाठी नागराज त्याला आर्थिक मदत करतोय आणि हितचिंतक मंडळीही त्याच्यासाठी पडेल ती जबाबदारी उचलायला तयार आहेत. 
 
पुण्यात वायसीएमला प्रवेश घेणार
करमाळ्यात माता-पित्याच्या मायेने सोमनाथवर लक्ष ठेवणारे प्रा.प्रदीप मोहिते व डॉ.संगीता मोहिते यांचा जब्याने पुण्यातील वायसीएम संस्थेत प्रवेश घ्यावा, असा मानस आहे. तिथे प्रवेश न मिळाल्यास तो करमाळ्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा 'कॉलेजकुमार' होणार. 
 
जब्या भेटला, वडील हलगी वाजवायला भिगवणला
सोमनाथची भेट करमाळ्यात झाली. त्याचे वडील लक्ष्मण मात्र त्यांच्या केम या गावी भेटू शकले नाहीत. ते भिगवण येथे एका कार्यक्रमात हलगी वाजवायला गेले होते.