शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

साडेसात हजार ग्रामपंचायतींची आॅक्टोबरमध्ये निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 05:49 IST

राज्यातील ७ हजार ५७६ ग्राम पंचायतींची निवडणूक ७ आणि १४ आॅक्टोबर रोजी होणार आहे. पहिल्यांदाच सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून होईल. राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी पत्रपरिषदेत ही घोषणा केली.

विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील ७ हजार ५७६ ग्राम पंचायतींची निवडणूक ७ आणि १४ आॅक्टोबर रोजी होणार आहे. पहिल्यांदाच सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून होईल.राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी पत्रपरिषदेत ही घोषणा केली. ते म्हणाले की, थेट सरपंचपदासाठी पहिल्यांदाच मतदान होत असल्याने आचारसंहितेबाबत विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एका मतदाराला कमीत कमी तीन व जास्तीत जास्त चार मते द्यावी लागतील. एक मत थेट सरपंचपदासाठी असेल; तर अन्य मते आपल्या प्रभागातील सदस्यपदांसाठी द्यावी लागतील.आचारसंहिता लागूनिवडणूक जाहीर झालेल्या सर्व ग्राम पंचायतींच्या क्षेत्रात आजपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. ज्या जिल्ह्यांत एकूण ग्रामपंचायतींपैकी ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्यास अशा जिल्ह्याच्या संपूर्ण ग्रामीण क्षेत्रात आचारसंहिता लागू असेल. ज्या तालुक्यात ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्यास अशा तालुक्याच्या संपूर्ण ग्रामीण क्षेत्रात आचारसंहिता लागू राहील. परंतु, निवडणूक नसलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकास कामांवर कोणतेही निर्बंध राहणार नाहील असे सहारिया यांनी स्पष्ट केले.७ आॅक्टोबर रोजी मतदान होत असलेल्या जिल्हानिहाय ग्राम पंचायती अशा : नाशिक १७०, धुळे १०८, जळगाव १३८, नंदुरबार ५१, अहमदनगर २०४, औरंगाबाद २१२, बीड ७०३, नांदेड १७१, परभणी १२६, उस्मानाबाद- १६५, जालना- २४०, लातूर- ३५३, हिंगोली- ४९,अमरावती- २६२, अकोला- २७२, यवतमाळ- ९३, वाशीम- २८७ आणि बुलडाणा- २८०. एकूण- ३८८४.१४ आॅक्टोबर रोजी मतदान होत असलेल्या ग्राम पंचायती : ठाणे ४१, पालघर ५६, रायगड २४२, रत्नागिरी २२२, सिंधुदुर्ग ३२५, पुणे २२१, सोलापूर १९२, सातारा ३१९, सांगली- ४५३, कोल्हापूर- ४७८, नागपूर- २३८, वर्धा- ११२, चंद्रपूर- ५२, भंडारा- ३६२,गोंदिया- ३५३ आणि गडचिरोली- २६. एकूण- ३६९२.