शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

सात नक्षली ठार, गडचिरोलीत चकमक, सर्वात मोठी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 05:00 IST

सिरोंचा तालुक्यातील कल्लेडच्या जंगलात बुधवारी पहाटे चकमकीत पोलिसांंनी ७ जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. त्यात ५ महिला व २ पुरुषांचा समावेश आहे.

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील कल्लेडच्या जंगलात बुधवारी पहाटे चकमकीत पोलिसांंनी ७ जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. त्यात ५ महिला व २ पुरुषांचा समावेश आहे. लाखोंची बक्षिसे लावलेल्या म्होरक्यांचा खात्मा झाल्याने, नक्षली चळवळीला मोठा हादरा बसला आहे.नक्षलवाद्यांच्या शिबिराची माहिती मिळताच, पोलिसांच्या पथकाने पहाटे कारवाई सुरू केली. पोलिसांची कुणकूण लागताच, नक्षल्यांनी गोळीबार सुरू केला, पण पोलीस भारी पडले. या वर्षी मंगळवारपर्यंत वेगवेगळ्या कारवाईत ९ नक्षलींना पोलिसांनी ठार केले. आजच्या कारवाईत पोलिसांना मोठेचे यश मिळाले.अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मोहिमेमुळे नक्षलवाद्यांना कारवाया करता आल्या नाहीत. नक्षलींचा २ डिसेंबरपासून सप्ताह सुरू आहे. त्या आधी नक्षलींनी पोलीस खबºया असल्याच्या संशयावरून ५ जणांची हत्या केली होती. कोटगूलच्या भूसुरुंग स्फोटात हवालदार सुरेश गावडे व टव्वेच्या चकमकीत सीआरपीएफ जवान मंजूनाथ शिवलिंगपा शहीद झाले होते.सहा मृत नक्षलवाद्यांची ओळख पटली७ पैकी ६ नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे. मयत आयतू उर्फ अशोक कंगा पेंदाम हा अहेरी दलम कमांडर म्हणून काम करीत होता. त्याच्यावर आठ लाखांचे बक्षीस होते. सिरोंचा दलम सदस्य सरितावर २ लाखांचे, एसीएम पदावर असलेल्या चंदूवर सहा लाखांचे, तर पेरमिली दलम सदस्य शैलावर २ लाखांचे बक्षीस होते. चार लाखांचे बक्षीस असलेल्या अखिला कुळमेथे व सिरोंचा दलमची एसीएम सुनीता कोडापे हिच्यावरही ६ लाखांचे बक्षीस होते.दारूगोळा, नक्षली साहित्य जप्तपोलिसांनी घटनास्थळावरून दोन एसएलआर, दोन ८ एमएम रायफल, दोन १२ बोअर रायफल, एक १२ बोअर कट्टा यांच्यासह दारूगोळा, नक्षलवाद्यांची पत्रके व इतर नक्षल साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त केले. दुपारी सर्वांचे मृतदेह अहेरी येथील प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात आणल्यानंतर, तेथून हेलिकॉप्टरने गडचिरोलीत आणण्यात आले. पोलिसांची झिंगानूर परिसरातीलजंगलाच्या भागात शोधमोहीम सुरूच होती.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी