शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीजवळ अपघातात मुंबईचे सात ठार

By admin | Updated: February 9, 2017 05:40 IST

मुंबईहून गोव्याला निघालेली मोटार फणसाच्या झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात सात तरुणांचा जागीच अंत झाला.

रत्नागिरी : मुंबईहून गोव्याला निघालेली मोटार फणसाच्या झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात सात तरुणांचा जागीच अंत झाला. पालीजवळील खानू येथे बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या अपघातात एक जण गंभीर जखमी असून, त्याच्यावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत सर्व जण विलेपार्ल्यातील शिवाजीनगर परिसरातील रहिवासी आहेत.अक्षय शंकर केरकर (चालक, २४, अमोघ सोसायटी), सचिन विश्वनाथ सावंत (३१, नरेशकुंज, भालेकरवाडी), मयूर वामन बेळणेकर (२८, कुलकर्णी चाळ), केदार बंडू तोडकर (२६, जुलेखाबाई चाळ), प्रशांत जगन्नाथ गुरव (३१), वैभव दामोदर मनवे (दोघेही सिद्धिविनायक सोसायटी), निहार सुधाकर कोटियन (चंद्राबाई आश्रम चाळ) अशी मृतांची नावे आहेत. गोव्याला जाण्यासाठी ते झायलो मोटारीतून रात्री साडेबारानंतर मुंबईहून निघाले होते. खानू बसस्थानकाच्या पुढील बाजूस फणसाच्या झाडावर त्यांची मोटार आदळली व त्यानंतर रस्त्यालगतच्या १० ते १२ फूट खोल गटारात जाऊन कलंडली. ही धडक एवढी भीषण होती की, मोटारीचा चक्काचूर झाला. अपघाताचा आवाज एवढा मोठा होता की, काही क्षण महामार्गावर भीषण स्फोट झाल्याच्या अंदाजाने ग्रामस्थ मदतीसाठी धावले. मात्र, भीषणता पाहून त्यांनाही धक्का बसला. चालकाच्या बाजूला बसलेले अभिषेक कांबळी गंभीर जखमी होऊन ओरडत होते. त्यांना ग्रामस्थांनी रुग्णालयात दाखल केले. दरवाजे लॉक झाल्याने क्रेनच्या साहाय्याने कार महामार्गावर आणून त्यानंतर गॅसकटरच्या साहाय्याने दरवाजे कापून मृतदेह बाहेर काढले. (वार्ताहर)