शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

सातशे रुग्णांना मिळाले ‘जीवनामृत’

By admin | Updated: July 4, 2015 00:13 IST

रक्तदान श्रेष्ठ दान : ‘जीवन अमृत’ची सातारा व सिंधुदुर्गच्या यशानंतर राज्यात अंमलबजावणी

जावेद खान - सातारा -राज्य शासनाने सुरू केलेल्या जीवन अमृत सेवेच्या माध्यमातून या दीड वर्षामध्ये जवळपास सातशे रुग्णांना जीवदान मिळाले आहे. शासनाने रोडमॉडेल म्हणून सातारा व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून या सेवेला सुरुवात केली असली तरी रुग्णांच्या हितासाठी ही सेवा आता संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली आहे.खासगी नर्सिंग रुग्णांना तातडीने रक्त मिळत नाही. त्यासाठी त्यांना रक्तदात्याला शोधावे लागते किंवा रक्तपिढीत जाऊन रक्तगट शोधावे लागत होते. त्यामुळे कधी-कधी रुग्णांच्या जीवितासाठी धोका निर्माण होत होता. यासाठी शासनाने रोड मॉडेल म्हणून सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ही योजना प्रथम सुरू केली. या योजनेअंतर्गत टोल फ्री नंबर ‘१०४’ वर खासगी होम मधील ज्या रुग्णांना रक्ताची आवश्यकता आहे. त्याना जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढी मार्फत शीतसाखळीद्वारे रक्ताची पिशवी पोहोच केली जाते. या सेवेसाठी रुग्णालयामार्फत एका पिशवीसाठी ८५० रुपये व ५० रुपये सर्व्हिस चार्ज घेतला जातो. साताऱ्यापासून ४० किलोमीटर अंतरापर्यंत ही सेवा सध्या उपलब्ध असून, या सेवेद्वारे अनेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे. म्हणून येत्या काही कालावधीतच जिल्ह्यातील वाई, पाटण, फलटण, खंडाळा, वडूज या तालुक्यांतील ही सेवा सुरू करण्याचा शासकीय रुग्णालयांचा प्रस्ताव आहे. मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला होता. गतवर्षी जवळ पास ४७५ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला तर सुरू वर्षी या सहा महिन्यात २११ रुग्णांना रक्त पुरवठा करण्यात आला आहे. महिन्याला जवळपास ६० ते ७० पिशव्यांची रुग्णालयांना गरज भासते. अशी मिळते रक्ताची पिशवी खासगी नर्सिंग होमद्वारे १०४ वर रक्ताची मागणी केल्यानंतर हा कॉल पुण्यातील लॅबमध्ये लागतो. ज्या परिसरातील मागणी आहे. त्या परिसरातील रुग्णालयास संपर्क साधून रक्त गटाची पिशवी घेऊन दुचाकी वाहनावरून संबंधित रुग्णालयापर्यंत पोहोचवली जाते. साधारण तासाभरातच रक्त मिळत असल्याने रुगणाची धावपळ वाचत आहे.अनेकांची फसगतही...खासगी नर्सिंगहोम मधून मागणी मिळताच रक्ताची पिशवी घेऊन संबंधित कार्मचारी रुग्णालयात हजर होतो. पण, बऱ्याच वेळा रक्ताची मागणी करणारे रुग्णच तेथे नसल्याने फसगतही होते.जीवन अमृत सेवेमुळे वेळेत हवा तो रक्तगट उपलब्ध होत आहे. अनेक वेळा रुग्णांना वेळेत रक्त मिळत नसल्याने जीवाला धोक्यात घालावे लागत आहे. परंतु या योजनेमुळे अनेक रुग्णांना जीवदानही मिळाले आहे. त्यामुळे ही सेवा संपूर्ण जिल्ह्यात सुरू करावी. जेणे करून गरजू लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल.-विजय जाधव, रुग्ण