अलिबाग : अल्पवयीन आदिवासी समाजातील मुलीवर अत्याचार करून तिला ठार मारणाऱ्या आरोपीला अलिबागच्या न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी आरोपीला २४ तासांच्या आत जेरबंद करून त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले. दगडाने ठेचून अल्पवयीन मुलीला ठार मारल्याच्या या घटनेने रायगड जिल्हा हादरला आहे. गेल्या काही वर्षांत अत्याचाराच्या घटनांत वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनेत अन्य आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
‘त्या’ आरोपीला सात दिवसांची कोठडी
By admin | Updated: October 15, 2016 04:27 IST