शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
6
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
7
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
8
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
9
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
10
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
11
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
12
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
13
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
14
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
15
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
16
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
17
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
18
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
19
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
20
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO

सांगली अर्बन बँकेचे सहा कोटी तुळजापुरात जप्त, निवडणूक पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2016 22:23 IST

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थिर सर्वेक्षण पथकाने सांगली अर्बन बँकेचे सहा कोटी रुपये सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास तुळजापुरात जप्त केले

ऑनलाइन लोकमतउस्मानाबाद, दि. 14 : पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थिर सर्वेक्षण पथकाने सांगली अर्बन बँकेचे सहा कोटी रुपये सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास तुळजापुरात जप्त केले. चौकशीत या पैशाबाबत बँकेच्या संबंधितांना समाधानकारक उत्तर देता न आल्याने रात्री उशिरा ही रक्कम जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे. सदर अर्बन बँकेचे अध्यक्ष सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांचे बंधू गणेश गाडगीळ हे असल्याने या प्रकरणी संशय वाढला आहे.

नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व प्रमुख मार्गांवर स्थिर सर्वेक्षण पथकाद्वारे तपासणी करण्यात येत आहे. असेच पथक सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास तुळजापूर बायपासवर वाहनांची तपासणी करीत होते. यावेळी एक जीप (क्र. एमएच १०/ बीएम ३१२७) पथकापासून काही अंतरावर रेंगाळत असल्याचे निदर्शनास आल्याने पथकातील अधिकाऱ्यांना संशय आला. पथकाने सांगली अर्बन को-आॅप. बँक असे दर्शनी भागावर नाव असलेल्या जीपची तपासणी केली असता त्यामध्ये सहा सिमेंटच्या गोण्यांमध्ये एक हजार, पाचशेसह इतर रुपयांच्या नोटा भरल्याचे आढळून आले. त्यामुळे पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी याबाबतची माहिती तातडीने पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांना दिली. यावर पोलिसांनी घटनास्थळी येवून गाडी तसेच नोटांच्या गोण्यांचा पंचनामा केला व सदर जीप पोलिस ठाण्यात आणली.

जीपमधील पैशांची मोजणी करण्याकरिता शहरातील पतसंस्थांमधील नोटा मोजण्याच्या चार मशिन्स व कर्मचारी मागविण्यात आले व दुपारी तीनच्या सुमारास या नोटा मोजण्याचे काम सुरू झाले. यावेळी पोलिसांनी जीपसोबत असलेल्या व्यक्ती रवींद्र भोसले, माणिक सौंदडे आणि आळवेकर यांना विचारले असता त्यांनी आपण बँकेचे कर्मचारी असल्याचे सांगितले. तसेच सदरची रक्कम परभणी व माजलगाव शाखेतील प्रत्येकी तीन कोटी रुपये इतकी असून, ही रक्कम बँकेच्या सांगली येथील मुख्य कार्यालयात जमा करण्यासाठी घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी दोन्ही शाखेचे लेटरपॅडवर लिहिलेले पत्रही पोलिसांकडे जमा केले. या पत्रावर माजलगाव शाखा येथील तीन कोटी रुपये आणि परभणी शाखेतील तीन कोटी याप्रमाणे नोटांचे विवरणपत्र आहे. अधिकारी म्हणतात, प्रकार संशयास्पदसहा कोटी ही रक्कम मोठी आहे. एवढी रक्कम वाहनातून नेताना बंदूकधारी सुरक्षारक्षक सोबत का घेतला नाही? तसेच निवडणूक कालावधीत बँकेच्या मुख्य कार्यालयात रक्कम जमा करायला जात असताना जबाबदार शासकीय अधिकाऱ्यांचे लेखी परवानगीपत्र आवश्यक असते. याबरोबरच सदर रक्कम घेऊन जाताना बँकेतील वरिष्ठ अधिकारीही सोबत असणे गरजेचे असते. मात्र, या प्रकरणात या सर्व त्रुटी आढळल्याने हा संपूर्ण व्यवहार संशयास्पद वाटतो, अशी प्रतिक्रिया सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजीव बुबणे यांनी दिली. दरम्यान, सदर रक्कम उस्मानाबाद येथील कोषागार कार्यालयात जमा करतानाच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मागविले असून,बँकेच्या सांगली येथील प्रधान कार्यालयाकडे सदर नोटा पाठवित असल्यामुळे ती रक्कम परत देण्याची विनंती संबंधित बँकेच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. त्यामुळे सदरील रक्कम संबंधित बँकेच्या ताब्यात द्यावी, किंवा कसे याबाबत मार्गदर्शन करावे, अशी विनंती त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याकडे एका लेखी पत्राद्वारे केली आहे.

शंभराच्या नोटा सोबत कशासाठी ?निवडणूक कालावधी, त्यातच हजार आणि पाचशेच्या नोटा बंद करण्याचा शासनाचा निर्णय, यामुळे संबंधित अधिकारीही या प्रकरणाची आता कसून चौकशी करू लागले आहेत. माजलगाव शाखेतील तीन कोटी रुपयांच्या विवरणपत्रात ५०० रुपयांच्या ४८ हजार म्हणजेच २ कोटी ४० लाख रुपये व १०० रुपयांच्या साठ हजार म्हणजेच ६० लाख रुपये अशी तीन कोटींची रक्कम असल्याचे म्हटले आहे. तर परभणी शाखेतील पैशांचे विवरण देताना १ हजार रुपयांच्या दहा हजार नोटा म्हणजेच १ कोटी आणि ५०० रुपयांच्या ४० हजार नोटा म्हणजेच ३ कोटी रुपये अशीे एकूण सहा कोटी रुपयांची रक्कम असल्याचे बँकेने म्हटले आहे. हजार-पाचशेबरोबर सध्या मोठ्या प्रमाणावर तूट असलेल्या शंभर रुपयांच्या नोटा मुख्य शाखेत कशासाठी नेल्या जात होत्या, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबरोबरच बँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या राष्ट्रीयकृत मदर बँकेत रक्कम जमा करण्याऐवजी ती मुख्य बँकेत नेण्याचा अट्टाहास कशासाठी, असाही प्रश्न यानिमित्ताने पुढे येत आहे.

सदर रक्कम कायदेशीर - गाडगीळसांगली अर्बन बँकेच्या बीड, माजलगाव, वसमत अशा मराठवाड्यातही शाखा आहेत. या शाखांमध्ये जुन्या नोटा साठल्या होत्या. तेथील शाखांनी इतर बँकांत कॅश भरणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठ्या बँकांनी ती कॅश स्वीकारली नाही. त्यामुळे सांगली मुख्यालयातून वाहन, कर्मचारी व आवश्यक ती कागदपत्रे घेऊन सदर कॅश सांगलीला आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कर्मचारी व वाहन पाठविण्यात आले होते. या वाहनावर सुरक्षा रक्षक नव्हता. पोलिस बंदोबस्तासाठीही वेळ लागणार होता. शिवाय बँकेचे सुरक्षा रक्षक मुंबई शाखेतील कॅश आणण्यासाठी गेले होते. तुळजापूरमध्ये सापडलेली सर्व रक्कम ही सांगली अर्बन बँकेची कायदेशीर रक्कम आहे. आम्ही सर्वती कागदपत्रे सादर करणार आहोत, असे बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.