शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दाऊदचे मोदी सरकारशी सेटलमेंट, फेसबुक पेजचे अनावरण, तरुणाईशी सोशल मीडियावरून संपर्क ठेवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 05:23 IST

नोटांचा रंग वगळता मोदी सरकारच्या कार्यकाळात कसलाही बदल झाला नाही. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी ‘सेटलमेंट’ करण्याचा प्रयत्नात असल्याचा खळबळजनक आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी केला.

मुंबई : नोटांचा रंग वगळता मोदी सरकारच्या कार्यकाळात कसलाही बदल झाला नाही. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकार कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी ‘सेटलमेंट’ करण्याचा प्रयत्नात असल्याचा खळबळजनक आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारीकेला.मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात राज ठाकरे यांच्या अधिकृत फेसबुक पेजचे अनावरण झाले. याप्रसंगी बोलताना राज ठाकरे यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. सार्वत्रिक निवडणुकांसाठी भाजपा काय करणार आहे, त्यांची रणनीती काय असणार आहे याची माहिती माझ्यापर्यंत पोहचली आहे. ज्या चारपाच योजना आखल्या जात आहेत; त्यापैकी एक दाऊदला भारतात आणण्याचे नाटक आहे. दाऊद विकलांग झाला असून त्याला भारतात येऊन त्याला मरायचे आहे. सध्या त्याची केंद्र सरकारशी सेटलमेंट सुरु आहे. त्याला भारतात आणल्याचे श्रेय घेण्यासाठी हाप्रकार असल्याचा आरोप राज यांनी केला. मोठ्या विश्वासाने लोकांनी नरेंद्र मोदी यांना सत्ता दिली. सोशल मीडियातील भक्तांनी जसा मोदींवर विश्वास ठेवला तसा मी पण ठेवला. पण, साडेतीन वर्षात इव्हेंट आणि भाषणांच्या पलीकडे काहीही झालेले नाही. सोशल मीडीयामुळे आता काहीही लपून राहत नाही.मोदींच्या ट्विटर अकाऊंटमधील ४८ टक्के तर राहुल गांधींच्या अकाऊटंमधील ५४ टक्के फॉलोअर्स फेक आहेत. पण, माझ्या फेसबुक पेजवर फक्त खरी माहितीच टाकली जाईल, असा चिमटा त्यांनीकाढला.शेतकरी आत्महत्यांसारखे महत्वाचे विषय सोडून बुलेट ट्रेनची योजना आखली जात आहे. मुंबई मेट्रोच्या लगत गुजराती मतदारसंघ तयार करण्याचा घाट घातला जातोय. मेट्रोच्या नावाखाली बिल्डींग्स पाडायच्या, महागडी घरं बांधायची, ती मराठी माणसाला परवडणार नाहीत आणि हळूहळू आपले मतदार संघ निर्माण करण्याचा डाव असल्याचा आरोप राज यांनी केला. विधानसभा निवडणुकीनंतर सततच्या पराभवांमुळे राज ठाकरे यांचा लोकांशी संपर्क तुटल्याचे बोलले जात होते. आता त्यावर उतारा म्हणून त्यांनी फेसबुक पेजचा आधार घेतल्याची चर्चा आहे.>राज ठाकरेंचा राणे यांना टोलामध्यंतरी भाजपाने फुटबॉल वाटले. फुटबॉल वाटले भाजपाने आणि सिंधुदुर्गात लाथ मारली काँग्रेसने! आता दोन्हीकडचे गोली म्हणतात माझ्याकडे नको, अशा शब्दांत राज यांनी नारायण राणे यांची फिरकी घेतली.