शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित गुन्हयांचा निपटारा तातडीने करा - पोलीस महासंचालकांचे आदेश

By admin | Updated: August 30, 2016 22:01 IST

गणोशोत्सव आणि बकरी ईदच्या बंदोबस्ताचा आढावा घेत प्रलंबित गुन्हयांचा निपटारा तातडीने करा, असे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी ठाणे पोलीस

- जितेंद्र कालेकर

ठाणे, दि. 30 -  गणोशोत्सव आणि बकरी ईदच्या बंदोबस्ताचा आढावा घेत प्रलंबित गुन्हयांचा निपटारा तातडीने करा, असे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी ठाणे पोलीस आयुक्तांसह सर्व वरीष्ठ पोलीस अधिका-यांच्या बैठकीत दिले. यावेळी संपूर्ण आयुक्तालयातील गुन्हयांचा आढावाही त्यांनी घेतला.    पोलीस महासंचालक पदाची सूत्रे घेतल्यानंतर माथूर यांनी प्रथमच सोमवारी ठाणो पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. यावेळी आयुक्तांच्या दालनात त्यांनी सायंकाळी 6 ते 7.30 या दरम्यान बैठक घेतली. यावेळी पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सह पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रतापसिंग पाटणकर, शरद शेलार, वाहतूक शाखेचे उपायुक्त संदीप पालवे, डॉ. रश्मी करंदीकर (मुख्यालय), संदीप भाजीभाकरे, पराग मणोरे (गुन्हे अन्वेषण विभाग), अभिजीत त्रिमुखे (ठाणो शहर), सुनिल लोखंडे (वागळे इस्टेट) यांच्यासह सर्व पोलीस उपायुक्त यावेळी उपस्थित होते.    आगामी गणोशोत्सवाच्या दृष्टीने यावेळी महासंचालकांनी आपल्या अधिका:यांना महत्वपूर्ण सूचना केल्या. ब:याचदा गणपती बंदोबस्ताचे नियोजन गेल्या तीन वर्षातील घटनांचा आढावा घेऊन केले जाते. तसे न करता अगदी दहा वर्षापूर्वीच्या घटना, बंदोबस्तामधील त्रुटींचाही अभ्यास करुन तसे नियोजन करावे. राज्य पोलीस मुख्यालयाकडे जादा मनुष्यबळाची मागणी करतांना बंदोबस्ताचे योग्य नियोजन करावे, वास्तविक तशी गरज आहे का? याची पडताळणी करावी. मंडळाचे नेमके पदाधिकारी आणि त्यांचे सल्लागार (मुख्य सूत्रधार) यांचीही पोलीस ठाण्याच्या पातळीवर सर्व माहिती असणो आवश्यक आहे णरायाचे आगमन, विसर्जनाच्या वेळा आणि मिरवणूकीच्या मार्गाची इथ्यंभूत माहिती सर्व उपायुक्तांसह अधिका:यांकडे असावी. विसर्जनाच्या वेळी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील जादा रुग्णवाहिका सज्ज ठेवाव्यात. तसेच विसर्जन तलाव आणि खाडीच्या ठिकाणी जीवरक्षक (पट्टीचे पोहणारे) ठेवल्याची खात्री करावी,असेही ते म्हणाले. याशिवाय, बकरी ईदचा बंदोबस्त करतांना चेक नाक्यांवर कसून तपासणी व्हावी. जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणा:यांवर करडी नजर ठेवा. पोलिसांचे काम अन्य कोणती यंत्रणा करीत असेल तर तसे व्हायला नको. पोलिसांना नागरिकांनी मदत जरुर करावी. पण पोलिसांऐवजी नागरिकच ती कामे करीत असेल तर तसेही व्हायला नको. उत्सवांच्या अथवा इतर काळातही एखादी दुर्घटना घडली तर बंदोबस्तामध्ये सुसूत्रता हवी. घटनेच्या गांभीर्यानुसार उपायुक्त, सहायक आयुक्त, वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांनी कधी भेटी द्याव्यात याचेही नियोजन करा. अन्यथा, सर्वच अधिकारी एकाच वेळी एकाच ठिकाणी जातील. गरजेनुसार ती विभागणी करा. गेल्या सहा महिन्यांमधील ठाणो आयुक्तालयातील ठाणो शहर, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळांमधील 33 पोलीस ठाण्यांमधील गुन्हयांचा आढावा घेऊन माथूर यांनी गंभीर गुन्हयांचे आरोपपत्र लवकर दाखल करण्याच्याही सूचना यावेळी केल्या.