शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर अपघातांचे सत्र

By admin | Updated: May 25, 2015 04:08 IST

मुंबई - गोवा महामार्गासाठी रविवार हा घातवारच ठरला. मध्यरात्री वहूर गावाजवळ भरधाव मिनीबसच्या चालकाचे नियंत्रण सुटून ती झाडावर आदळल्याने झालेल्या

मुंबई : मुंबई - गोवा महामार्गासाठी रविवार हा घातवारच ठरला. मध्यरात्री वहूर गावाजवळ भरधाव मिनीबसच्या चालकाचे नियंत्रण सुटून ती झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले, तर २३ जण गंभीर जखमी झाले. दुसऱ्या अपघातात पहाटे पेण येथील आंबिवली - गोर्विले फाट्यावर ट्रकला दिलेल्या धडकेत सिलिंडर भरलेल्या ट्रकने पेट घेतला. या अपघातात सिलिंडरचे एकामागोमाग एक भीषण स्फोट झाले. यात एक महिला जखमी झाली. दरम्यान, आणखी एका अपघातात मुंब्रा बायपासमार्गे गुजरातहून तळोजाकडे चाललेल्या टँकरचा पेडल तुटल्याने वाहनचालकाचा ताबा सुटून अमोनिया रसायनाने भरलेला टँकर मुंब्रा बायपासजवळील नाल्यात कोसळला.संगमेश्वर ते वसई नालासोपारा जाणारी प्रवासी मिनीबस महाड तालुक्यातील वहूर गावच्या हद्दीत रात्री २.१५ च्या सुमारास बस (एमएच ०४ एफके ८२) रस्त्याकडेच्या झाडावर धडकली. या अपघातात बसमधील श्रेयस सनगरे (१२, रा. नालासोपारा), नीलेश जांभळे (३२, रा. विरार) हे प्रवासी जागीच ठार झाले. तर बळवंत मोहिते (३४), रेखा मोहिते (३०), प्रज्वल मोहिते (३), अथर्व मोहिते (८), सर्व रा. गोवंडी, मुंबई, संजीवनी जाधव (३२), साक्षी जाधव (१३), स्वयंम जाधव (१०, रा. वांद्रे), नंदू गायकवाड (३८), सीमा गायकवाड (३४), सलोनी गायकवाड (१०), श्रेहान गायकवाड (११), सर्व रा. नालासोपारा, राजेश पडवळ (३५), जोत्स्ना पडवळ (३२), आर्यन पडवळ (५), मानसी पडवळ (१०) सर्व रा. शिवडी, विठ्ठल घडशी (५३, रा. नालासोपारा), कल्पना गमरे (५०, बांद्रा), रघुनाथ रहाटे (२६, रा. संगमेश्वर, रत्नागिरी), रामचंद्र कांबळे (५१, सांताक्रूझ), शर्वरी भानत (२२, रा. मुंबई), मीनाक्षी कांबळे (१६, रा. सांताक्रूझ), शिवाजी गमरे (२४, रा. नालासोपारा) असे २३ प्रवासी गंभीर स्वरूपात जखमी झाले. या सर्व जखमींना महाड ट्रॉमा केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. १९ प्रवासी गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर तात्पुरते उपचार करून मुंबई केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. दोन प्रवासी ट्रॉमा केअरमध्ये तर दोन प्रवासी महाडमधील रानडे यांच्या खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. अपघातानंतर महाड महामार्ग पोलीस व महाड शहर पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र या ठिकाणी रुग्णवाहिका एक तास उशिरा पोहोचल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. या दरम्यान वहूर गावचे नागरिक व या मार्गावरून जाणाऱ्या अन्य वाहनातल्या प्रवाशांनी जखमींना खाजगी वाहनातून महाड येथे रुग्णालयात पोहोचवण्याचे काम केले. (प्रतिनिधी)