शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
7
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
8
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
9
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."

सर्व्हिस रोड नोव्हेंबरअखेर पूर्ण

By admin | Updated: May 2, 2015 01:23 IST

घोडबंदर रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याने या ठिकाणी दोनही बाजूने छोट्या वाहनांसाठी सेवा रस्ता असावा, अशी मागणी पुढे आल्यानंतर या ठिकाणी

ठाणे : घोडबंदर रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याने या ठिकाणी दोनही बाजूने छोट्या वाहनांसाठी सेवा रस्ता असावा, अशी मागणी पुढे आल्यानंतर या ठिकाणी १४ किमीच्या सेवा रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. त्यानुसार, पातलीपाड्यापर्यंत या सेवा रस्त्याचे काम पूर्ण झाले असून उर्वरित सहा किमीच्या रस्त्यात वन विभाग, एमएसईबीचे ट्रान्सफॉर्मर आदींसह इतर अतिक्रमणांचा अडथळा आल्याने या रस्त्याचे काम रखडले होते. परंतु, आता या अडथळ्यांची शर्यत पार करून येत्या नोव्हेंबरअखेरपर्यंत या सेवा रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल, असा दावा ठाणे महापालिकेने केला आहे.घोडबंदर रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यानंतर या रस्त्याच्या दोनही बाजूला कापूरबावडी ते गायमुख अशा १४ किमीच्या सेवा रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यातील पातलीपाड्यापर्यंतच्या सेवा रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. पुढील सेवा रस्त्याचे काम शिल्लक असल्याने सध्या यावर कारवाईसुद्धा केली जात नसल्याचे पालिका सूत्रांचे म्हणणे आहे. सेवा रस्ता पूर्ण झाल्यानंतर हा रस्ता केवळ लहान वाहनांसाठीच खुला केला जाईल, असेही पालिकेने स्पष्ट केले. या दोनही बाजूकडील सेवा रस्त्याचा खर्च हा ९३.८८ कोटी आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात २६४ बांधकामे बाधित झाली आहेत. यामध्ये ३५ निवासी आणि २२९ व्यावसायिक बांधकामांचा समावेश आहे. परंतु, आता दुसऱ्या टप्प्यात वन विभागाचा सव्वा किमीचा रस्ता येत असल्याने त्यांनी अद्यापही परवानगी दिली नसल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली. तसेच महावितरणचे काही ट्रान्सफॉर्मरदेखील या सेवा रस्त्यात येत आहेत. मानपाडा भागातील ट्रान्सफॉर्मर अद्यापही हटविण्यात आलेला नाही. त्यामुळे हादेखील मोठा अडथळा या सेवा रस्त्यात आहे. तसेच एका कंपनीचे गेटही या सेवा रस्त्यात येत आहे. परंतु, यासंदर्भात पावले उचलून पुढील कार्यवाही करून रस्त्याचे काम सुरू केले जाईल, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. १५ नोव्हेंबर ही या सेवा रस्त्याची डेडलाइन आहे. परंतु, याच कालावधीत हा रस्ता सर्वांसाठी खुला होईल असेही पालिकेने स्पष्ट केले.