शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सेवा संरक्षण दलाची

By admin | Updated: April 30, 2017 02:35 IST

संरक्षण दलाचे स्थलसेना (भूदल) नौदल व वायुसेना हे तीन विभाग आहेत. स्थलसेना हा भारतीय सैन्य दलाचा सर्वांत मोठा विभाग आहे. यात बढतीच्या, विकासाच्या

- प्रा. राजेंद्र चिंचोलेसंरक्षण दलाचे स्थलसेना (भूदल) नौदल व वायुसेना हे तीन विभाग आहेत. स्थलसेना हा भारतीय सैन्य दलाचा सर्वांत मोठा विभाग आहे. यात बढतीच्या, विकासाच्या नेतृत्वगुणाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. नौदलात बंदराच्या ठिकाणी व समुद्रात नोकरी, स्पर्धात्मक वातावरण, आव्हान पेलण्याची क्षमता, सतत शिकण्याची गरज, कर्तृत्वाला वाव या संधी उपलब्ध आहेत. वायुसेनेत शहरी भागात नियुक्ती, निर्यातक्षमता, मानसिक क्षमता, जिज्ञासूवृत्ती, बुद्धिमत्ता या गुणांना भरपूर संधी आहे.संरक्षण दलातील नोकरी हे एक उदात्त व राष्ट्रसेवेचे कार्य आहे. सैन्यदलाबद्दल जनतेला प्रचंड आदर आहे. संरक्षण दलात नोकरी करताना देशसेवा, राष्ट्रप्रेम, शिस्तप्रिय जीवन, साहस, धैर्य, कष्ट, अभ्यास, नवीन आव्हान या गुणांना वाव मिळतो. देशाचे परकीय आक्रमणापासून रक्षण करून देशवासीयांची सुरक्षितता सांभाळणे, देशात शांतता प्रस्थापित करणे, देशाची अंतर्गत सुरक्षा व नागरिकांचे रक्षण करणे या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या संरक्षणदलास सांभाळायच्या असतात.दहावी, बारावीनंतर अथवा पदवीनंतर संरक्षण दलात नोकरी करायची आहे, असे म्हणणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे. संरक्षण दलाविषयी अनेक नकारात्मक दृष्टीकोन असतात. संरक्षण दलाच्या लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, मुलाखती व वैद्यकीय चाचणी या अत्यंत कठीण असतात. येथे डोंगर, दऱ्या, बर्फाळ प्रदेश यात नोकरी, अतिरेक्यांशी सामना, संरक्षण दलात जिवाला धोका, सातत्याने बदल्या, सातत्याने युद्ध या गैरसमजुतींमुळे अनेकांना संरक्षण दलाविषयी फारशी माहिती नसते. कृषी, कायदा, विज्ञान, तंत्रज्ञान, संगणकशास्त्र, माहिती व तंत्रज्ञान या विषयांतून पदवी प्राप्त करणाऱ्या युवकांना संरक्षण दलात करिअरच्या भरपूर संधी असतात. मात्र येथे करिअर करण्यासाठी सूत्रबद्ध, शिस्तबद्ध नियोजनाची गरज असते.संरक्षण दलातील नोकरी ही देशासाठी अभिमानास्पद बाब आहे. या नोकरीत चांगला पगार, आर्थिक सुरक्षितता, चांगल्या सुविधा, निवृत्तिवेतन, वन रँक पेन्शन, बचतीच्या उत्तम संधी, भत्ते, विशेष वेतन मिळते. शिवाय व्यावसायिक प्रशिक्षण, केंद्रीय विद्यालयात व उच्च शिक्षणात पाल्यांना प्रवेशात अग्रक्रम, MBA व MCS करण्यासाठी रजा या सुविधा आहेत. तसेच कल्याण निधीच्या माध्यमातून पाल्यांना शिक्षणासाठी मदत, शिष्यवृत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.संरक्षण दलात अधिकारी किंवा शिपाई अशा दोन प्रकारे प्रवेश मिळतो. संरक्षण दलात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी सैनिक व्हायचे किंवा अधिकारी व्हायचे हे ध्येय अगोदर निश्चित केले पाहिजे. सैनिक किंवा जवान म्हणून १०वी किंवा १२वीनंतर आणि वायुदल, नौदलात १२वीनंतर प्रवेश देण्यात येतो. नौदल, वायुदलाच्या काही विशिष्ट विभागांसाठी १०वीनंतरही प्रवेश देण्यात येतो. महाराष्ट्रात औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथे भूदल आणि नौदल सैनिकांसाठी प्रवेश केंद्र आहेत. वायुदलातील एअरमन म्हणून भरतीसाठी मुंबई येथील कॉटनग्रीन वायुदलाच्या केंद्रात प्रवेश आहेत.संरक्षण दलात अधिकारी होण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ((UPSC)) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी व नाविक अकादमी (NDA व NA) ची परीक्षा घेतली जाते. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) एकत्रित संरक्षण सेवा परीक्षा (CDS) ही परीक्षाही संरक्षण दलातील अधिकारी होण्यासाठी घेतली जाते. तसेच टेरोटरिअल आर्मीच्या माध्यमातून संरक्षण दलात अधिकारी होता येते. त्याच प्रकारे (NCC) च्या सी सर्टिफिकेट मिळालेल्या विद्यार्थ्यांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्डामार्फत संरक्षण दलात अधिकारी होण्याची संधी उपलब्ध आहे. ‘टेक्निकल ग्रॅज्युएट एन्ट्री स्कीम’, ‘टेक्निकल एन्ट्री स्कीम’, ‘जज अ‍ॅडव्होकेट एन्ट्री’ व ‘युनिव्हर्सिटी एन्ट्री स्कीम’द्वारे संरक्षण दलात अधिकारी होण्याची संधी उपलब्ध आहे. संरक्षण दलात मुलींनाही अधिकारी होता येते. संरक्षण दलाच्या सेवेत कनिष्ठांचा आदर व वरिष्ठांचा विश्वास हा मूलमंत्र आहे.