शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

डबेवाल्यांची सेवा महाग

By admin | Updated: July 19, 2015 02:13 IST

गेली १२५हून अधिक वर्षे मुंबईच्या चाकरमान्यांचे डबे पोहोचविणाऱ्या डबेवाल्यांनीही आता प्रत्येक डब्यामागे १०० रुपये वाढविण्याचा निर्णय घेतला असून, ही भाववाढ लागू झालेली आहे.

मुंबई : गेली १२५हून अधिक वर्षे मुंबईच्या चाकरमान्यांचे डबे पोहोचविणाऱ्या डबेवाल्यांनीही आता प्रत्येक डब्यामागे १०० रुपये वाढविण्याचा निर्णय घेतला असून, ही भाववाढ लागू झालेली आहे. शिवाय, डब्यात पाण्याची अथवा ताकाची बाटली असल्यास अधिक पैसे मोजावे लागणार असल्याचा निर्णय मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळातर्फे घेण्यात आला आहे.मुंबईत जवळपास ५ हजार डबेवाले दिवसाला दोन ते तीन लाख डबे पोहोचवितात. डबेवाल्यांना या सेवेव्यतिरिक्त इतर उत्पन्नाचे साधन नसल्याने महागाईची झळ पोहोचत आहे. त्यामुळे पूर्वी दरमहिना ७०० रुपये दर असलेल्या डब्याचे आता ८०० रुपये झाले असल्याचे मंडळाचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी सांगितले. तसेच डब्यात पाण्याची अथवा ताकाची बाटली असल्यास अधिकचे ५० रुपये आकारण्यात येतील असेही नमूद केले.गेल्या काही वर्षांत मुंबईत अनेक उद्योगांनी डोके वर काढले. मात्र डबेवाल्यांच्या सेवेत खंड पडला नाही. गेल्या वर्षी केवळ २० ते ३० टक्के वाढ करण्यात आली होती, परंतु मुंबईसारख्या शहरात डबेवाल्यांना एवढ्या कमी उत्पनात भागविणे कठीण जात आहे. त्यामुळे ही वाढ करण्यात आली असून, कुरिअरच्या सेवेपेक्षाही हे दर कमी आहेत, असे तळेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)