शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सर्व्हर डाऊनमुळे रजिस्ट्री पेंडिंग

By admin | Updated: January 9, 2015 00:53 IST

रेडिरेकनरमधील वाढीचा भुर्दंड टाळण्यासाठी वर्षाच्या शेवटी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी होणारी गर्दी, मध्येच येणाऱ्या शासकीय सुट्या व त्यातही आॅनलाईन नोंदणीचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे निबंधक

नागरिकांची गैरसोय : संपूर्ण रेडिरेकनर अपलोड नाही नागपूर : रेडिरेकनरमधील वाढीचा भुर्दंड टाळण्यासाठी वर्षाच्या शेवटी मुद्रांक शुल्क भरण्यासाठी होणारी गर्दी, मध्येच येणाऱ्या शासकीय सुट्या व त्यातही आॅनलाईन नोंदणीचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे निबंधक कार्यालयांमध्ये बहुतांश रजिस्ट्री ‘पेंडिंग’ आहेत. मालमत्तेच्या रजिस्ट्रीसाठी निबंधक कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांना तासन् तास वाट पाहून परतावे लागत आहे. २८ डिसेंबरपासून आॅनलाईन सर्व्हर डाऊन झाले आहे. त्यामुळे प्रत्येक निबंधक कार्यालयात दररोज होणाऱ्या रजिस्ट्रीच्या तुलनेत फक्त १० टक्केच रजिस्ट्री होत आहेत. नोंदणीचे सर्व्हर मुंबईहून संचालित केले जाते. तेथूनच सर्व्हरची स्पीड कमी झाली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर काहीच करता येणार नाही, अशी हतबलता नोंदणी निबंधक व्यक्त करीत आहेत. नागपूर शहरातील निबंधक कार्यालयांमध्ये एरव्ही रजिस्ट्रीसाठी गर्दी असतेच. मात्र, हिवाळी अधिवेशनाच्या काळात रजिस्ट्रीचा ओघ कमी झाला. कागदपत्र अपूर्ण असतानाही ‘अ‍ॅडजेस्टमेंट’ करून रजिस्ट्री करणे या काळात बंद राहिले. त्यामुळे २४ डिसेंबरपर्यंत फार कमी रजिस्ट्री झाल्या. २५ डिसेंबरला ख्रिसमसची सुटी आली. २८ डिसेंबरला रविवारची सुटी आली. १ जानेवारीपासून वाढीव दराचे रेडिरेकनर लागू होते. याची माहिती असल्यामुळे मालमत्तेच्या खरेदी-विक्रीसाठी ३१ डिसेंबरपूर्वी मुद्रांक शुल्क भरण्यावर नागरिकांचा भर असतो. या वेळीही तसेच झाले. २६ व २७ डिसेंबर रोजी निबंधक कार्यालयात गर्दी उसळली. अशातच २७ डिसेंबर रोजी सर्व्हर ‘डाऊन’ झाले. २८ डिसेंबरलाही सर्व्हरची समस्या कायम राहिली.ई.एम. नोटिंगसाठी लागतोय सरचार्ज बँकेकडून कर्ज घेऊन एखादी मालमत्ता खरेदी केली असेल तर खरेदीच्या तारखेपासून एक महिन्यात संबंधित मालमत्तेचे दुय्यम निबंधकाकडे ‘इक्विटेबल मॉर्गेज नोटिंग’ करावे लागले. या मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर खरेदीदाराला मालमत्ता खरेदीसाठी लागलेल्या मुद्रांक शुल्काच्या एक टक्का रकमेचे चालान भरावे लागते. हा एकप्रकारे भुर्दंडच असतो. ज्या नागरिकांनी नोव्हेबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बँक लोनवर मालमत्ता खरेदी केली ते आता ‘इक्विटेबल मॉर्गेज नोटिंग’साठी दुय्यम निबंधक कार्यालयात येत आहेत. मात्र, सर्व्हर डाऊन असल्यामुळे त्यांचे नोटिंगचे काम झालेले नाही. आता त्यांना रजिस्ट्रीच्या एक टक्का चालान भरावा लागणार आहे. सर्व्हर डाऊन असल्यामुळे नोटिंगचे काम रखडले आहे. त्यासाठी आम्ही भुर्दंड का भरायचा, असा प्रश्न संबंधित मालमत्ता धारकांनी उपस्थित केला आहे. मुद्रांक शुल्क निश्चित करताना अडचणी ‘इयर एंडिंग’मुळे रजिस्ट्री करणाऱ्यांची, मुद्रांक शुल्क भरणाऱ्यांची संख्या वाढली व दुसरीकडे सर्व्हर डाऊन झाले. यामुळे रजिस्ट्रीचे वेटिंग वाढत गेले. नव वर्षात नवे रेडिरेकनर लागू झाले. पण संपूर्ण शहराचे नवे रेडिरेकनर पूर्णपणे अपलोड झाले नव्हते. त्यामुळे मुद्रांक शुल्क निश्चित करताना अडचणी आल्या. या कारणास्तव पुन्हा वेटिंग वाढत गेले. ३ जानेवारीला काही प्रमाणात रजिस्ट्री करण्यात आल्या. ४ जानेवारीला पुन्हा रविवारची सुटी आली. ५ व ६ जानेवारी रोजी नागरिक रजिस्ट्रीसाठी पोहचले तेव्हा त्यांना खूप जास्त रजिस्ट्री आधीच पेंडिंग असल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेकांना दिवसभर वाट पाहून रजिस्ट्री न करताच परतावे लागले. ७ तारखेला दुपारनंतर सर्व्हरमध्ये पुन्हा तांत्रिक बिघाड आला. आज, गुरुवारीही दिवसभर सर्व्हर डाऊन राहिले. त्यामुळे दररोजच्या तुलनेत १५ टक्केच रजिस्ट्री झाल्या. आजही अनेकांना परतावे लागले. उद्या, शुक्रवारीही हीच समस्या कायम राहिली तर नागरिकांना थेट सोमवारपर्यंत वाट पहावी लागेल. कारण, १० तारखेला आठवड्यातील दुसरा शनिवार व ११ तारखेला रविवार असल्यामुळे सुटी आहे. (प्रतिनिधी)