शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये डंपर -टेम्पोच्या अपघातात एक गंभीर

By admin | Updated: July 16, 2016 22:24 IST

मुंबई - आग्रा महामार्गावरील इनायत कॅफेसमोरील उड्डाणपुलावर बंद पडलेल्या डंपरवर टेम्पो आदळून झालेल्या अपघातात टेम्पोचालक गंभीर जखमी झाल्याची घटना

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 16 -  मुंबई - आग्रा महामार्गावरील इनायत कॅफेसमोरील उड्डाणपुलावर बंद पडलेल्या डंपरवर टेम्पो आदळून झालेल्या अपघातात टेम्पोचालक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि़१६) रात्रीच्या सुमारास घडली़ विशेष म्हणजे टेम्पोत अडकलेल्या चालकास अग्निशमन दलाने दरवाजा तोडून बाहेर काढल्याने त्याचे प्राण वाचले़ दरम्यान या चालकास उपचारासाठी आडगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे़ 

मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साडेसात वाजेच्या सुमारास मुंबईहून नाशिकला येणारा श्रीनाथ अर्थ मुव्हर्सचा डंपर (एमएच १२, एचडी ४९१३) हा इनायत कॅफेसमोरील उड्डाणपुलावर बंद पडला़ त्यावेळी पाठिमागून आलेल्या कोंबड्यांची वाहतूक करणाºया रिकाम्या टेम्पोने या डंपरला धडक दिल्याने तिची काच तुटली़ मात्र, संबंधित टेम्पोचालक तिथून गेला़ यानंतर आलेल्या कोंबड्यांची वाहतूक करणारा दुसरा रिकामा टॅम्पोही (एमएच ०४, ३७७२) या डंपरवर आदळला़
या अपघातात  टेम्पोचा चालक मुजाराम मेटकर (रा़शहापूर) हा गंभीररित्या अडकल्याने त्यास बाहेर निघणेही मुश्किल असल्याने जोरजोरात ओरडत होता़ या घटनेची माहिती अग्निशमन दलास मिळताच लिडींग फायरमन इक्बाल शेख, फायरमन तानाजी भास्कर, घनश्याम इंफाळ, शिवाजी खुळगे, उदय शिर्के, वाहनचालक देवीदास इंगळे तसेच सहायक पोलीस आयुक्त डॉ़राजू भुजबळ आदींसह वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले़ 
अग्निशमन दलाच्या जवानांनी टेम्पोचा दरवाजा तोडून जखमी चालक मेटकरला बाहेर काढल्याचे त्याचे प्राण वाचले़ यानंतर त्यास अधिक उपचारासाठी आडगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले़ या अपघाताची मुंबई नाका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)