शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पेपर फोडला अन् स्वतःच्याच नातेवाइकांना दिल्या नोकऱ्या; विधानसभेत धक्कादायक पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 08:38 IST

‘कृषी’च्या वर्ग-४ भरतीत झालेल्या भ्रष्टाचाराचा विधानसभेत पर्दाफाश   

मुंबई : अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांमध्ये २००८ साली कृषी विभागातील वर्ग-४ पदांच्या भरतीत गंभीर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी संगनमत करून ही भरती प्रक्रिया अपारदर्शक पद्धतीने राबवली. या भरतीत स्वतःच्या नातेवाइकांना लाभ मिळवून दिल्याचे आरोप आहेत.

विधानसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सरकारने दिलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे. भाजपचे सुरेश धस यांनी याबाबतचा प्रश्न विचारला होता, तसेच ‘लोकमत’ने याबाबत घेतलेल्या अधिकच्या माहितीतही धक्कादायक बाबी समोर आल्या.

काय आहे प्रकरण?२००८ मध्ये उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या सहकार्याने वर्ग-४ भरतीसाठीच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका लीक केली. नियमबाह्य पद्धतीने नातेवाइकांना अधिक गुण देऊन त्यांची निवड केली. याची चौकशी कृषी आयुक्तालय व विभागाच्या आस्थापना शाखेकडून तब्बल ८ वर्षांनंतर सुरू करण्यात आली. मात्र, चौकशी सुरू असतानाच संबंधित अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून नेमण्यात आले.

विभागीय चौकशीत उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी पदाचा दुरुपयोग करून नातेवाइकांना अनुचित लाभ दिल्याचे स्पष्ट झाले. तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे यांनी या प्रकरणात सहकार्य केल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले. तरी त्यांच्यावर फौजदारी कारवाई न करता त्यांची विभागीय कृषी सहसंचालक (अमरावती) पदावर नियुक्ती करण्यात आली. लहाळे हे अकोला व बुलढाणा जिल्ह्यांत कार्यरत असताना, या भरतीत भ्रष्टाचार झाल्याचे ठोस आरोप आहेत.

प्रामाणिक उमेदवारांवर भरती प्रक्रियेत अन्यायया भरती प्रक्रियेमुळे परीक्षा दिलेल्या अनेक प्रामाणिक आणि पात्र उमेदवारांवर अन्याय झाला आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रश्नपत्रिका फोडून आप्तेष्टांना पूर्वसूचना दिली आणि नोकऱ्या मिळवून दिल्या. परिणामी, परीक्षा रद्द करण्यात आली.

व्यवहार संशयास्पद; लेखा परीक्षणात गंभीर आक्षेपलेखा परीक्षण पथकाने अकोला, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांतील तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडून खर्च करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांवर आक्षेप घेतले आहेत. ताळमेळ न लागणे, अपूर्ण नोंदी आणि आवश्यक दस्तऐवजांचा अभाव यामुळे आर्थिक व्यवहार संशयास्पद असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.

टॅग्स :jobनोकरी